इस्‍कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याच्या कारवाईचा बांगला देशातील हिंदूंनी तीव्र निषेध केला आहे. (PTI Photo)
आंतरराष्ट्रीय

बांगला देशची 'दडपशाही' सुरुच, 'इस्कॉन'च्या ५४ सदस्यांना भारतात जाण्यापासून रोखले

Bangladesh : विशिष्ट सरकारी परवानगी नसल्याचे दिले कारण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देश (Bangladesh) सरकारची देशातील हिंदूंच्या विरोधात दडपशाही सुरुच आहे. दरम्यान, आता वैध प्रवासी कागदपत्रे असूनही बांगला देशच्या सीमा अधिकाऱ्यांनी इस्कॉनच्या (Iskcon) डझनभर सदस्यांना भारतात जाण्यापासून सीमेवर रोखले असल्याचे वृत्त आहे. बांगला देशाच्या विविध जिल्ह्यातील भाविकांसह इस्कॉनचे ५४ सदस्य शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी बेनापोल बॉर्डर क्रॉसिंगवर दाखल झाले होते. पण, त्यांना तेथे अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्याकडे प्रवास करण्यासाठी अधिकृत परवानगी नसल्याचे सांगण्यात आले, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

बांगला देश सरकारने इस्कॉन संस्थेला लक्ष्य केले आहे. या संस्थेशी संबंधित पूजाऱ्यांना अटक करणे आणि त्यांची बँक खाती गोठवण्यात आल्याचे याआधी उघडकीस आले आहे. आता त्यांना भारतात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. इमिग्रेशन पोलिस अधिकाऱ्यांनी बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारशी बोलतोना सांगितले की, त्यांना उच्चस्तरावरुन इस्कॉनच्या सदस्यांना भारतात जाण्यासाठी परवानगी न देण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

बेनापोल इमिग्रेशन पोलिस अधिकारी इम्तियाज अहसानुल कादर भुईया यांनी सांगितले की, "आम्ही पोलिसांच्या विशेष विभागाकडे सल्लामसलत केली आहे आणि त्यांना (सीमा ओलांडण्याची) परवानगी न देण्याच्या सूचना आम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून मिळाल्या आहेत.

विशिष्ट सरकारी परवानगी नसल्याचे दिले कारण

सीमेवरील पोलिस अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, इस्कॉन सदस्यांना भारतात धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहायचे आहे. त्यांच्याकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसादेखील आहे. पण त्यांना आवश्यक असलेली विशिष्ट सरकारी परवानगी मिळालेली नाही. ते या परवानगीशिवाय सीमापार जाऊ शकत नाहीत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सीमेवर रोखले

इस्कॉनचे सदस्य असलेले सौरभ तपंदर चेली म्हणाले, "आम्ही भारतात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालो होतो. पण आम्हाला सरकारी परवानगी नसल्याचे कारण देत इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सीमेवर रोखले".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT