Anthony Albanese Marriage:
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानेस यांनी पार्टनर जोडीए हडॉन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अँटोनी यांनी आज (दि. २९ नोव्हेंबर) रोजी गुप्तपणे आणि अत्यंत खासगी पद्धतीनं त्यांचे राजधानी कॅनबेरा येथील अधिकृत निवासस्थानी हा सोहळा आटोपला. विशेष म्हणजे अँटोनी हे ऑस्ट्रेलियन सरकारांच्या १२४ वर्षाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी आपल्या अधिकृत कार्यालयात लग्न केलं आहे. अँटोनी आणि जोडीए यांनी ६० जणांच्या उपस्थितीत हा विवाह केला. यात काही कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश होता.
दरम्यान, या लग्नाची थोडी देखील कल्पना माध्यमांना नव्हती. लग्नसोहळा पार पडल्यानंतर माध्यमांना यााबबत माहिती समजली. या नवविवाहित जोडप्यानं 'आमचं उर्वरित आयुष्य आम्ही प्रेमानं अन् वचनबद्धतेनं एकत्रित घालवणार आहोत याची घोषणा करताना आम्हाला मोठा आनंद होत आहे. आम्ही आमचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या साक्षीनं लग्न केलं आहे.' असं अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं.
पंतप्रधान अँटोनी आणि त्यांची पत्नी जोडीए यांच्या लग्नात रिंग घेऊन त्यांचा श्वान टोटो आला होता. तर हेडॉन यांची ५ वर्षाची भाची ही फ्लॉवर गर्ल होती.
६२ वर्षाचे अँटोनी हे घटस्फोटीत असून त्यांना एक मोठा मुलगा देखील आहे. त्यांनी ४६ वर्षाच्या हेडॉन यांना गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रपोज केलं होतं. हेडॉन या फायनान्स प्रोफेशनल्स आहेत. त्यांची अँटोनी यांच्याशी २०२० मध्ये मेलबर्न येथील एका बिजनेस डीनर दरम्यान झाली होती.
त्यांनी आपला विवाह हा मे महिन्यात झालेल्या निवडणुकीआधी करण्याचं ठरवलं होतं. पंतप्रधान अँटोनी यांनी यावेळी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन टुंड्रो यांना देखील आमंत्रित करण्याचा विचार केला होता.
मात्र या लग्नामुळं सेंटर लेफ्ट लेबर पार्टीला निवडणुकीत फटका बसण्याची भीती होती. त्यामुळं त्यांनी लग्नाचा विचार पुढं ढकलला. निवडणुकीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अँटोनी यांनी २०२५ मध्ये लग्न होईल असं सांगितलं होतं मात्र तारीख जाहीर केली नव्हती. त्यानंतर आता अँटोनी यांनी पंतप्रधान म्हणून एक वर्ष पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांनी लग्न केलं आहे.