Attack On Iran Natanz Nuclear Facility: मध्य पूर्व आशियातील युद्धाचा ज्वर अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणचे सर्वात सुरक्षित आणि संवेदनशील मानले जाणारे नतांज अण्विक केंद्रावर भीषण हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून नतांज न्युक्लिअर फॅसिलिटीवर पुन्हा एखदा बॉम्ब वर्षाव केला आहे. यामुळं या भागात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नतांज अण्विक संवर्धन केंद्रावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची तीव्रता इतरी होती की या स्फोटाचे आवाज दूरवर ऐकू येत होते. मात्र इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात दिलासादायक माहिती समोर आळी आहे. सध्याच्या घडीला तरी नतांज न्युक्लिअर फॅसिलिटीमध्ये रेडिएशनचा धोका निर्माण झालेला नाही.
इराणच्या माध्यमांनी दावा केला आहे की स्फोट जरी मोठा असला तरी आसपासच्या रहिवासी भागातील लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलला इराणचा अणुकार्यक्रम थांबवायचा आहे. त्याचाच भाग म्हणून हा नवा हल्ला करण्यात आला आहे.
इराणचे नतांज अण्विक केंद्र हे शत्रूच्या सतत रडारवर राहिलं आहे. २०२५ पासून या साईटवर अनेकवेळा हल्ले झाले आहेत. प्रत्येक हल्ल्यात याच्या स्ट्रक्चर आणि यंत्रसामुग्रीचं नुकसान होत. मात्र पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होईल असे रेडिएशन लीक अजूनपर्यंत झालेलं नाही.
गेल्या वर्षी जून महिन्यात इस्त्रायल आणि इराण यांच्यात १२ दिवसांचे भीषण युद्ध झाले होते. त्यावेळी देखील नतांज इस्त्रायलच्या मुख्य टार्गेटवर होता. त्यावेळी अमेरिकेने थेट सहभाग घेत बंकर बस्टर बॉम्ब हल्ला केला होता. आता पुन्हा याच ठिकाणी बॉम्ब वर्षाव झाला आहे. यामुळं आता मध्य पूर्व आशियातील परिस्थिती अजूनच विस्फोटक होण्याची शक्यता आहे.