आंतरराष्ट्रीय

ऑस्ट्रेलियातील भूस्खलनात संपूर्ण गावचं गायब! 300 हूनअधिक लोक ढिगाऱ्याखाली

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागामधील पापुआ न्यू गिनीमधील काओकलम गावात झालेल्या भूस्खलनामुळे 300 पेक्षा अधिक लोक गाडले गेली आहेत. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. असे स्थानिक माध्यमांनी शनिवारी (दि.25) सांगितले. शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास राजधानी पोर्ट मोरेस्बीमध्ये सुमारे 600 किमी अंतरावर असणाऱ्या एन्गा प्रांतातील काओकलम गावात झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा बेपत्ता आहेत. यावरून स्थानिक वृत्तपत्र पापुआ न्यू गिनी पोस्ट कुरिअर संसदचे खासदार अमोस अकेम यांच्या वक्तव्याचा आधार घेत म्हणाले आहे की, भूस्खलनामुळे सुमारे 300 लोक बेपत्ता असल्याने मृत लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे 1182 हून अधिक लोक गाडले गेले आहेत.

शुक्रवारी (दि.24) स्थानिक वेळेनुसार पहाटे संपूर्ण काओकलाम गाव धुळीत मिसळले. ते पीएनजीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या आकडेवारीची पुष्टी केलेली नसली तरी, स्थानिक रहिवाशांनी मृतकांचा आकडा वाढत असल्याचे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला (ABC) सांगितले आहे. तसेच ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (ABC) म्हणण्यानुसार, दरड कोसळल्याने महामार्गावर वाहतुकीचा मार्ग बंद झाला असून सध्या हेलिकॉप्टर घेवून जाण्याशिवाय पर्याय नाही.

पंतप्रधान जेम्स मारापेंनी केला शोक व्यक्त

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. तसेच आपत्ती अधिकारी आणि संरक्षण दलांनी ग्रामीण भागातील रहिवाशांना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले, असून ते घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या दुर्घटनेनंतर पोरगेरा वुमन इन बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा एलिझाबेथ लारुमा यांनी सांगितले की, "भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत. येथील अनेक झाडे ही भूस्खलनात नष्ट झाली आहेत. यामुळे दबल्या गेलेल्यां लोकांचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. तर या दुर्घटनेवरून लारुमा यांनी सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांकडून या प्रदेशाला तात्काळ मदत जाहीर केली आहे."

भूस्खलनापूर्वीच जाणवले होते भूकंपाचे धक्के

पापुआ न्यू गिनी काओकलमध्ये भूस्खलनापूर्वी भूकंपाचे तिव्र धक्केही जाणवले होते. हा भूकंप फिन्शाफेनच्या वायव्येस 39 किलोमीटर अंतरावरचा होता. याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल होती. या गोष्टीची पुष्टी युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनेही केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT