Baba Vanga Predictions  File Photo
आंतरराष्ट्रीय

Baba Vanga Predictions : एलियनशी संपर्क, मंगळावरील युद्ध: बाबा वेंगाची आगामी वर्षांची भविष्यवाणी...

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत २०२५ मध्ये युरोपमध्ये मोठा संघर्ष

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

Baba Vanga Predictions व्हेंजेलिया पांडेवा गुश्तेरोवाय, ज्‍यांना बाबा वेंगा म्‍हणूनही ओळखले जाते. या एक अंध बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होत्‍या. जी 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी मरण पावल्‍या. त्‍यांच्या मृत्यूनंतरही, जगभरातील लोक अजूनही त्‍यांच्या भविष्यवाण्यांनीने मोहित आणि तितकेच भयभीतही आहेत. 'बाल्कनचा नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, बाबा वेंगा यांनी दावा केला की, वयाच्या बाराव्या वर्षी त्‍यांची दृष्टी गेली आणि नंतर भविष्यवाणीची देणगी त्‍यांना प्राप्त झाली. ज्‍यामुळे भविष्‍यातील अनेक घटनांचे भाकित करण्याची शक्‍ती त्‍यांना प्राप्त झाली. त्‍यांनी केलेल्‍या अनेक भविष्‍यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्‍या आहेत. २०२५ या सालातील घटनांची भाकितेही वेंगा यांनी खूप वर्षे अधीच करून ठेवली आहेत. यामुळे जगाच्या चिंतेत भर पडली आहे.

२०२५ मध्ये युरोपात मोठा संघर्ष

२०२५ साठी केलेल्‍या भाकितांमध्ये युरोपमध्ये मोठा संघर्ष हाेईल. त्‍यामुळे या खंडातील लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट होईल असे त्‍यांनी म्‍हटले आहे. युरोपमध्ये गेल्‍या काही महिण्यांमध्ये ज्‍या पद्धतीने घटना घडत आहेत. त्‍या पाहता वेंगा यांची भविष्‍यवाणी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

एलियनशी मानवजातीचा संपर्क

एलियनशी म्‍हणजेच परग्रहवासीयांशी मानवजातीचा संपर्क होईल अशी भविष्‍यवाणीही वेंगा यांनी करून ठेवली आहे. पण यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कारण एलियन जर मानवापेक्षा प्रगत असतील तर मानवाने त्‍यांच्याशी संपर्क करू नये अशी मते काही शास्‍त्रज्ञांनी मांडली आहेत. तसे झाले अन् मानवाचा एलियनशी संपर्क झाला तर ते पृथ्‍वी आणि मानवजातीसाठी धोकादायक ठरू शकते.

अमेरिकन बांधवांवर दोन धातूचे पक्षी आदळतील

Marca.com नुसार, 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर झालेला दहशतवादी हल्ला हा त्‍यांच्या सर्वात प्रमुख आणि खऱ्या ठरलेल्‍या अंदाजांपैकी एक होता. त्‍यामध्ये त्‍यांनी "आमच्या अमेरिकन बांधवांवर दोन धातूचे पक्षी आदळतील, लांडगे झुडपांतून ओरडतील आणि निष्पापांचे रक्त नद्यांमध्ये वाहू लागेल," असे भाकीत केले होते. हा संदेश उलगडलेल्या दुःखद घटनांसारखाच आहे. कारण यानंतर या भविष्‍य कथनाप्रमाणे ही घटना जशीच्या तशी घडली. यामध्ये अमेरिकेच्या ट्विन टॉवर्स या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्‍ला झाला. यामध्ये दहशतवाद्यांनी दोन विमानांचे हायजॅक करून ती या दोन जुळ्या ईमारतींना एका पाठोपाठ एक या प्रमाणे धडकवली होती. ज्‍यामध्ये हजारो निष्‍पाप लोकांचा मृत्‍यू झाला होता. हा अमेरिकेवरचा खूप मोठा दहशतवादी हल्‍ला ठरला होता.

जगाच्या अंताची तारीख

वेंगा यांच्या अनेक भाकितांपैकी एक म्‍हणजे जगाचा अंत, होय जगाच्या अंताची तारीखही त्‍यांनी सांगितली आहे. बाबा वेंगांच्या मते, "अकल्पनीय" वैश्विक घटनेमुळे 5079 मध्ये जगाचा अंत होईल असे भाकित बाबा वेंगाने करून ठेवले आहे. यासाठी अजुनही बरीच वर्षे असली तरी त्‍या आधीच्या वर्षांसाठीही वेंगा यांनी भविष्‍य कथन करून ठेवले आहे. त्‍या प्रमाणे घटना घडल्‍या तर काही चांगल्‍या तर काही विपरीत घटनांमुळे मानवजातीवर संकटांची मालिकाच येणार असल्‍याने जगाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

पुढील दशकांसाठी बाबा वेंगाचे मुख्य अंदाज पुढीलप्रमाणे

  • 2025: युरोपमधील मोठ्या संघर्षामुळे खंडातील लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट होईल.

  • 2028: उर्जेचे नवीन स्त्रोत शोधण्याच्या प्रयत्नात मानवता शुक्रावर पोहोचेल.

  • 2033: ध्रुवीय बर्फाच्या वितळण्यामुळे समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल.

  • 2076: जागतिक स्तरावर साम्यवाद परत येईल.

  • 2130: अलौकिक सभ्यतेशी संपर्क होईल.

  • 2170: जागतिक दुष्काळाचे संकट

  • 3005: मंगळावरील युद्ध.

  • 3797: पृथ्वीचा नाश, सूर्यमालेतील दुसऱ्या ग्रहावर जाण्यास मानव सक्षम होईल.

  • 5079 : जगाचा अंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT