Ali-Asghar Hejazi Alive: इराणमध्ये सध्या दिवंगत सुप्रीम लीडर अयतोल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीचा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यावेळी एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ज्यावेळी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला चढवला होता त्या हल्ल्यात इराणच्या अनेक महत्वाच्या नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
अशाच आयतोल्ला खामेनी यांचा जवळचा सहकारी अली असगर हेजाझी यांचा देखील मृत्यू झाल्याच्या बातम्या पाश्चात्य देशात झळकल्या होत्या. मात्र काही महिन्यातच आयतोल्ला खामेनी यांच्या अंत्यविधी सोहळ्यावेळी अली असगर हेजाझी दिसल्यामुळं एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेजाझी हे जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या युएस इस्त्रायल हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या होत्या. मात्र त्यांनी खामेनी यांच्या अंत्यविधीला हजेरी लावली. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इराणसोबतचा संघर्ष अजून संपलेला नाही असं वक्तव्य केलं. त्यांनी अमेरिका इराण यांच्यातील नव्या तणावाच्या वातावरणामुळे इस्त्रायलला नवीन सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
इस्त्रायली एअर फोर्सच्या ग्रॅज्युएशन सोहळ्यात बोलताना नेतान्याहू यांनी सांगितलं की, इस्त्रायलच्या हवाई दलाची ताकद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची आहे. तसेच मध्य पूर्व आशियातील स्थैर्यासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पाकिस्तानने मध्यस्थी केलेला इराण युएस करार रद्द झाला आहे अशी घोषणा केली. त्यानंतर नेतान्याहू यांनी इस्त्रायली आर्मी चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल झमीर यांनी सांगितलं की इराणविरूद्धचे लष्करी अभियान अजून संपुष्टात आलेलं नाही असा इशारा दिला. नवीन ऑपरेशनल प्लॅन्स तयार करण्यात आले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मोठे ऑपरेशन आपल्या समोर असणार आहेत असा देखील नेतान्याहू यांनी इशारा दिला.