तात्याना ओझोलिना हिचा अपघाती मृत्यू Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

Tatyana Ozolina | रशियन मोटोब्लॉगर तात्याना ओझोलिना हिचे अपघाती निधन

2023 मध्ये मोटोब्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने केले होते सन्मानित

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाची सर्वात सुंदर बाईक रायडर अशी ओळख असलेली तात्याना ओझोलिना हिचा तुर्कीमध्ये एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. ओझोलिनाचे सोशल मीडियावर 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तुर्किमध्ये, ओझोलिनाने तिच्या बाइकवरील नियंत्रण गमावले, त्यानंतर तिची दुचाकी ट्रकला धडकली. ओझोलिना तिची लाल बाईक बीएमडब्लू एस 1000 आरआर 2015 चालवत होती. राजधानी मुग्ला आणि प्रसिद्ध रिसॉर्ट बोडरम दरम्यान हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Tatyana Ozolina | रशियामधील सर्वात सुंदर बाइकर

सनच्या वृत्तानुसार, समोरून येणारा ट्रक पाहून ओझोलिनाने शेवटच्या क्षणी ब्रेक मारला, मात्र ट्रकने थेट तिच्या दुचाकीला धडक दिली. ओझोलिनासोबत आणखी एक तुर्की बाईकस्वार ओनुर ओबुत हा देखील बाइक चालवत होता, त्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ओझोलिनाचा मृत्यू झाला होता. 38 वर्षीय ओझोलिनाला रशियामधील सर्वात सुंदर बाइकर घोषित करण्यात आले होते.

मोटोब्लॉगर ऑफ द इयर

तात्याना ही एक प्रसिद्ध मोटोब्लॉगर होती. तात्यानाला 2023 मध्ये मोटोब्लॉगर ऑफ द इयर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ऑफ द इयर या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते. तिचे सोशल मिडियावर 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या या अशा जाण्याने तिच्या सर्व चाहत्यांना दुख:द धक्का बसला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT