The incident took place around 9:30 in the morning
सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलीFile Photo

संतापजनक! बॅनर अंगावर घेतलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

२१ वर्षांच्या कपिल विलास अंकुरे ह्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला
Published on

पिंपरी : पावसात अंगावर बॅनर घेऊन झोपलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

कपिल विलास अंकुरे (21, रा. बोरी, परभणी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

The incident took place around 9:30 in the morning
लोणावळा: भुशी धरणात ४ लहान मुलासह ५ जण बुडाले

खून की अपघात?

वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी बसस्टॉपजवळील मोकळ्या मैदानात खून झाला असल्याची माहिती एकाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना एका बॅनरखाली कपिल याचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांची सफाई

कपिल यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंगावर कोणत्याही मारहाणीच्या खुना नव्हत्या. शवविच्छेदन अहवालात देखील डोक्यावरून चाक गेल्याने कपिल याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

दरम्यान, कपिल याने अंगावर बॅनर घेतला असल्याने अज्ञात वाहन चालकाला ते दिसले नाहीत. त्यामुळे वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news