Abbas Araghchi Israel Hit List pudhari
आंतरराष्ट्रीय

Abbas Araghchi Israel Hit List: भारताला 'सेफ पॅसेज' देणारे परराष्ट्रमंत्रीही होते इस्त्रायलच्या रडारवर... पाकमुळं घेतली माघार

Anirudha Sankpal

Abbas Araghchi Israel Hit List: अमेरिका-इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका युद्धबंदीसाठी प्रयत्न करत असून इराणने मात्र आपल्या अटी शर्तींवरच चर्चा होईल असं ठामपणे सांगितलं आहे. दुसरीकडं जगभरातील कच्च तेल आणि गॅसची कोंडी फोडण्यासाठी इराणने आपल्या मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझमधून सेफ पॅसेज दिला. याबाबतची माहिती इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिली होती.

दरम्यान, आता रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्रायल इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना देखील टार्गेट करणार होते. त्यांचे सर्व कोऑर्डिनेस्ट इस्त्रायलकडे होते. मात्र पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराघची यांना हिटलिस्टमधून काढून टाकण्यात आलं.

मग चर्चा कोणासोबत करायची?

पाकिस्तानी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसदेतील स्पीकर मोहम्मद बकर घालीबफ हे देखील इस्त्रायलच्या हिट लिस्टवर होते. मात्र पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली की त्यांना टार्गेट करू नका, रॉयटर्सच्या वृत्तानुसार इस्त्रायलकडे या दोघांची सगळी माहिती होती. इस्त्रायलला या दोघांनाही मारायचं होतं इस्त्रायलं मात्र आम्ही अमेरिकेला सांगितलं की जर या दोघांना मारलं तर चर्चेसाठी कोणी उरणारच नाही. त्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलला माघार घेण्यास सांगितलं.'

इराण घाबरत आहे

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांततेच्या चर्चेत सहभागी व्हायचं आहे. मात्र ते हे सांगायला घाबरत आहेत. कारण सध्याच्या सत्ताधाऱ्यांना त्यांना त्यांचेच लोक मारून टाकतील अशी भीती आहे. दरम्यान, व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलीन यांनी इराणनं वास्तव मान्य केलं नाही तर डोनाल्ड ट्रम्प इराणवर अजून जोरदार हल्ला करतील असं वक्तव्य केलं होतं.

अधिकृत चर्चा नाही

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आता वाटाघाटी करतोय. त्यांना काही करून डील करायची आहे. मात्र ते सांगायला घाबरत आहेत. कारण त्यांना भीती आहे की त्यांचेच लोक त्यांना मारून टाकतील. याचबरोबर ते आम्ही त्यांना मारून टाकणार यासाठी देखील घाबरत आहेत.

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं की इराण अमेरिकेने पाकिस्तानमार्फत पाठवलेल्या प्रस्तावाचा अभ्यास केला. मात्र इराणचा युद्ध थांबवण्यासाठी अधिकृत चर्चा करण्याचे कोणताही उद्येश नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT