आंतरराष्ट्रीय

Dog swallowed money : कुत्र्याने गिळले ३ लाख, मालकाने ‘या’ मार्गाने मिळवले काही पैसे

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कधी कधी माणसाला आपल्या छोट्याशा चुकीबद्दल खूप मोठी किंमत चुकवावी लागते. त्यावेळी त्याच्याकडे पश्चातापाशिवाय दुसरा पर्यायचं उरत नाही. अमेरिकेतील एका घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील एका पाळीव कुत्र्याने मालकाचे तीन लाख रुपये गिळले.  त्या कुत्र्याची तब्येत बिघडल्यानंतर ही बाब समोर आली. आपल्या निष्काळजीपणामुळे मालकाला तीन लाख रूपये गमवावे लागले. या घटनेमुळे आपल्या किमती वस्तू पाळीव प्राण्यांसमोर निष्काळजीपणाने ठेवून जाणाऱ्या लोकांचे डोळे उघडले आहेत.

गार्डियन वेबसाइटच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील पेनसिव्हेनिया येथे कॅरी लॉ आणि क्लेटन हे जोडपे राहते. सेसिल नावाचा त्यांनी एक कुत्रा पाळला होता. या जोडप्याने त्यांच्या जॉइंट अकाउंट मधून ३ लाखापेक्षाही जास्त पैसे काढले होते. त्यांनी ते पैसे स्वयंपाक घरातील किचन कट्ट्यावर ठेवले होते. काही वेळानंतर कुत्र्याने ती रक्कम पाहिली. व काही वेळातच ती खाऊन टाकली. सेसिलची तब्येत बिघडल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

गार्डियनशी बोलताना कॅरी म्हणाली , सेसिलने पैसे खाल्याचे क्लेटनने मला सांगितल्यानंतर मला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांनतर आम्हाला हे पैसे वाया जाण्याची भीती वाटली. त्यानंतर या जोडप्याने असे काही केले जे आपण विचारही करू शकणार नाही. कुत्र्याच्या विष्ठेतून पैसे मिळवण्याची त्यांनी योजना आखली. व त्यांनी या पद्धतीने काही पैसे मिळवले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT