आंतरराष्ट्रीय

Mali Bus Accident : मालीमध्ये भीषण बस अपघात; ३१ जण ठार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम आफ्रिकन देश माली येथे मंगळवारी भीषण बस अपघात झाला. मालीच्या पश्चिमेकडील केनिबा शहराजवळ नदीच्या पुलावरून बस कोसळून ३१ जणांचा मृत्यू झाला, असे परिवहन मंत्रालयाने सांगितले. (Mali Bus Accident)

या अपघातातील मृतांमध्ये पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचाही समावेश आहे. परिवहन मंत्रालयाने सांगितले की, बस बुर्किना फासोला जात होती. नदीपुलाजवळ आले असता बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून नदीत कोसळली. (Mali Bus Accident)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT