105 year old skydivers | १०५ वर्षांच्या आजोबांनी वाढदिनानिमित्त विमानातून उडी मारत केला स्काय-डायव्हिंगचा विक्रम 
आंतरराष्ट्रीय

105 year old skydivers | १०५ वर्षांच्या आजोबांनी वाढदिनानिमित्त विमानातून उडी मारत केला स्काय-डायव्हिंगचा विक्रम

आजोबा आहेत माजी नौदल सैनिक, १०४ व्या वाढदिनादिवशी केली होती घोडेस्वारी

Namdev Gharal

spurgeon ‘butch’ carlson वय केवळ आकडा असतो हे एका अमेरिकन आजोबांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आपल्या १०५ व्या वाढदिनानिमित्त त्‍यांनी थेट विमानातून उडी घेत स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवला आहे. आपल्या आयुष्यात कधीतरी स्काय डायव्हिंग करायचे हा निश्चय असलेल्या या माजी सैनिकाने वयाच्या १०५ व्या वर्षी हा अनुभव घेतला. असे करणारे ते इतक्या वयाचे दुसरे व्यक्ति ठरले आहेत. सर्वाधिक वयात स्कायडायव्हिंग करण्याचा विक्रम एका १०६ वर्षाच्या आजोबांच्या नावे आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की माजी ज्येष्ठ सैनिक असलेले अमेरिकन नौदलाचे (U.S. Navy) १०५ वर्षांचे ज्येष्ठ सैनिक स्पर्जअन “बच” कार्लसन spurgeon ‘butch’ carlson यांनी हे अभूतपूर्व धाडस केले आहे. १९ जुलै २०२६ रोजी न्यू यॉर्कमधील अल्बियनजवळील 'पाइन हिल' विमानतळावर त्यांनी तज्ज्ञांच्या साथीने विमानातून उडी घेत स्कायडायव्हिंगचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले. या खास प्रसंगी त्यांचा परिवार आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्लसन यांना दरवर्षी आपल्या वाढदिवसाला काहीतरी अनोखे आणि थरारक करण्याची आवड आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच १०४ व्या वाढदिवशी त्यांनी आपल्या ९९ वर्षांच्या भावासोबत घोडेस्वारी केली होती. यावर्षी त्यांनी आपल्या ‘बकेट लिस्ट’मधील स्कायडायव्हिंगचे स्वप्न पूर्ण केले. या स्कायडायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लाखो लोक त्यांच्या या उत्साहाचे कौतुक करत आहेत.

जगातील सर्वात जास्त वयाच्या स्कायडायव्हरच्या 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'पासून कार्लसन आता अवघे एक वर्ष दूर आहेत. ‘वयामुळे कधीही नवीन अनुभव घेण्यापासून थांबायचे नसते; स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतेही वय उशीर झालेले नसते’ असे मत कार्लसन यांनी हा उपक्रम पार पाडल्यानंतर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT