अमेरिकेत भारतीयांच्या एक लाख नोकऱ्या धोक्यात File Photo
आंतरराष्ट्रीय

Unemployment In America| अमेरिकेत आर्थिक मंदीचा तडाखा; एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात

Unemployment In America| गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनच्या ले-ऑफचा भारतीयांवर परिणाम; अमेरिकेत एक लाख नोकऱ्या धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेतील आर्थिक मंदीची परिस्थिती, वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता वापर भारतीयांच्या मुळावर आला आहे. तब्बल एक लाखापेक्षा अधिक नोकऱ्या धोक्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. भारतीयांना नोकरी शोधण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

आयटी क्षेत्रातील अग्रगण्य गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ले-ऑफ देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसह युरोपमध्येदेखील हे चित्र पाहायला मिळत आहे. याचा फटका भारतीय तरुणांना बसत आहे. नोकरी संपुष्टात आल्यामुळे त्यांना कामानिमित्त संबंधित देशाने राहण्यासाठी दिलेला परवाना (वर्क व्हिसा)

टिकविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने अमेरिकेत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), आयटी क्षेत्र, ग्राहक सेवा आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन वेगाने वाढत आहे. प्रामुख्याने एआयचा विकास दर ६२ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गार्टनरच्या अहवालाचे आकडे

बोलू लागल्याने परदेशी भारतीयांनी धसका घेतला आहे. अमेरिकेत सध्या सुमारे ६ लाख भारतीय व्यावसायिक एच १ वी व्हिसाधारक आहेत. एआयमुळे नोकऱ्या गमावण्याचा धोकादेखील मोठा निर्माण झाला आहे. मोठ्या कंपन्या वेगाने एआय मॉडल्सचा अवलंब करत आहेत. मॅकेन्झी ग्लोबलच्या

अहवालानुसार, अमेरिकेतील ऑटोमेशनमुळे, २०३० पर्यंत सुमारे १ कोटी २० लाख लोक एकतर त्यांच्या नोकऱ्या गमावतील किंवा त्यांना इतर क्षेत्रातील नोकऱ्या शोधाव्या लागतील. फॉरेस्टरच्या अहवालानुसार, आयटी क्षेत्रातील एआय बूमचा थेट परिणाम भारतीयांवर होणार आहे. सिलिकॉन

व्हॅलीमध्येही तीन वर्षांत स्टार्टअपमधील नोकऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा सरासरी विकास दरही ७ वर्षाच्या नीचांकी पातळीवर जाईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. या स्थितीला रशिया युक्रेन युद्धाची जशी झालर असल्याचे ही बोलले जात आहे.

तीन लाखांपेक्षा अधिक भारतीय

अमेरिकेत सुमारे तीन लाखांवर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अमेरिकेला भारतीय बुद्धिमान तरुण गमवायचे नाहीत, असा याच अर्थ होतो. बुद्धिमान भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्याची इच्छा असते. अमेरिकेत सध्या जे ६ लाखांवर परदेशी कर्मचारी व्यावसायिक व्हिसावर कार्यरत आहेत, त्यात भारतीयांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. यातही सॉफ्टवेअर इंजिनिअर बहुसंख्य आहेत. अमेरिकेतील एकूण सॉफ्टवेअर इंजिनिअर्समध्ये भारतीयांचे प्रमाण ५ टक्के आहे.

बेरोजगारीचा दर ४.१ टक्के : अमेरिकेच्या नोकऱ्यांत आणि रोजगारामध्ये जूनमध्ये भरघोस वाढ झाली. त्यापैकी सरकारी आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात सुमारे तीन चतुर्थांश नोकऱ्या निर्माण झाल्या. मात्र, तरीही बेरोजगारीचा दर गेल्या अडीच वर्षांतील उच्चांकी म्हणजे ४.१ टक्क्यांवर पोहोचला. नोकऱ्यांच्या क्षेत्रात अल्पशी मंदी त्यातून सूचित होते. परिणामी, फेडरल रिझर्व्ह ही मध्यवर्ती बँक लवकरच व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल. मजूर खात्याच्या रोजगार अहवालानुसार अर्थव्यवस्थेने एप्रिल आणि मे मध्ये पूर्वीच्या अंदाजापेक्षा १,११,००० कमी नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, अमेरिकन अर्थव्यवस्थेने जूनमध्ये २०६००० नोकऱ्या निर्माण केल्या, मेमध्ये ही संख्या २,१५००० होती. बेरोजगारीचा दर ०.१ टक्क्यांनी वाढून ४.१ टक्केवर गेला, नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच बेरोजगारीचा दर ४ टक्क्यांच्या वर आहे.
अनिल टाकळकर, ज्येष्ठ पत्रकार, अमेरिका
66 अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या कंपन्यांमधून काढून टाकण्यात येत आहे. भारतात परतल्यावर नोकरी शोधण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अमेरिकेत मिळणाऱ्या पगारापेक्षा कमी पगारात काम करावे लागत आहे. मी अमेरिकेत एमएस पूर्ण केलेले आहे. मात्र, नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे.
रोशन माहेश्वरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT