पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यू जर्सीमधुन धक्कादाक माहिती समोर येत आहे. बुधवारी (दि.३) न्यू जर्सीमधील मस्जिद मुहम्मद मशिदीबाहेर इमाम हसन शरीफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.(International News)
माहितीनुसार, नेवार्कमधील मस्जिद मुहम्मद मशिदीबाहेर इमाम हसन शरीफ यांना गोळ्या घालण्यात आल्या. नेवार्कचे सार्वजनिक सुरक्षा संचालक फ्रिट्झ फ्रेज यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी (दि.३) 6 वाजल्यानंतर पोलिस गोळीबाराच्या ठिकाणी पोहोचले. मारेकरी फरार असल्याचे वृत्त असून हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, नेवार्कचे महापौर, रास जे. बाराका ग्वाही दिली की, "अधिकारी "गुन्हेगाराला कितीही वेळ लागला तरी त्याला न्याय मिळवून देतील.""इमाम हसन शरीफ या शहरातील लोकांसोबत होते आणि आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभे राहू," बरका पुढे म्हणाले.
न्यू जर्सीचे ऍटर्नी जनरल, मॅथ्यू प्लॅटकिन यांनी बुधवारी (दि.३) दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, गोळीबार पूर्वाग्रहाने प्रेरित होता किंवा ते दहशतवादी कृत्य होते असे कोणतेही संकेत नाहीत, परंतु त्यांनी न्यू जर्सीच्या मुस्लिमांमध्ये चिंता आणि भीतीची भावना वाढल्याचे मान्य केले.
हेही वाचा