मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुन्हा एकदा इन्फ्लूएंझाचा (Influenza Virus) प्रादुर्भाव वाढू लागला आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत ३२ टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. महामुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरमध्ये राज्यात स्वाइन फ्लूचे ५३ रुग्ण आढळून आले होते, त्यात जानेवारीत वाढ होऊन ही संख्या ७८ झाली आहे. यासोबतच जानेवारी महिन्यात नागपुरात एका रुग्णाचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाला आहे.
साधारणतः हिवाळा संपल्यानंतर इन्फ्लूएंझा विषाणू (Influenza Virus) सक्रिय होत असला, तरी गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही इन्फ्लूएंझाने थैमान घातले आहे. गतवर्षी पावसामुळे इन्फ्लूएंझासह इतर हंगामी आजारांचा प्रादुर्भाव झाला होता. राज्यात यंदाही थंडी जाणवत आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरमध्ये ५३ प्रकरणांपैकी ३५ प्रकरणे फक्त महामुंबईत आढळून आली आहेत. यामध्ये ३२ रूग्ण फक्त मुंबईतील आहेत. तीच परिस्थिती यावर्षी जानेवारीतही पाहायला मिळाली. जानेव ारीमध्ये ७८ रुग्णांपैकी ५१ रुग्ण फक्त महामुंबईत आढळले होते., त्यापैकी ४६ रुग्ण मुंबईतील आहेत. यानंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालय विभागाचे उपसंचालक बाविस्कर म्हणाले की, डॉ. कैलास सततच्या खोकल्याबरोबरच जास्त ताप ही मुख्य लक्षणे असू शकतात. याशिवाय काही रुग्णांना वास येत नाही. कोणतेही काम न करता थकवा जाणवतो. स्नायू दुखणे असू शकते. दीर्घकाळ टिकणारी डोकेदुखी, घसा खवखवणे, नाक चोंदणे किंवा वाहणारे नाक याकडे दुर्लक्ष करू नये. (Influenza Virus)
लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्ध लोकांना या लोकांचा धोका जास्त असतो. याशिवाय हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार, मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा लोकांना लक्षणे दिसू लागताच त्यांनी ताबडतोव त्यांच्या जवळच्या हॉस्पिटल किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि स्वतःवर उपचार करून घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. हर्षद लिमा यांनी सांगितले की, एच१एन१ आणि एच३एन२ हे दोन्ही इन्फ्लुएंझा ए व्हायरसचे उपप्रकार आहेत. इन्फ्लूएंझा ए व्हायरसचा सर्वात प्रचलित उपप्रकार एच१एन१ आहे. सामान्यतः स्वाइन फ्लू म्हणून ओळखला जातो. हा प्रचर्चा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये खालच्या श्वसनमार्गास संसर्ग होतो. हा देखील इन्फ्लूएंझा-ए विषाणूचा उपप्रकार एच३एन २ आहे. त्याला हाँगकाँग फ्लू असेही म्हणतात. दोघांची लक्षणे सारखीच आहेत. तो खोकल्यामुळे आणि शिकण्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो.
हेही वाचा :