[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अधिक पहा" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
जयपूर; वृत्तसंस्था : भारतीय रेल्वे देशातील हायस्पीड ट्रेनसाठी राजस्थानातील जोधपूरलगतच्या गुढा-थथाना मिठाडी या लहान स्थानकांदरम्यान हा 59 कि.मी.चा हायस्पीड टेस्टिंग ट्रॅक तयार होत आहे. या ट्रॅकवर ताशी 220 कि.मी. वेगाने धावणार्या गाड्यांची चाचणी होईल. (Indian Railways)
वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य हायस्पीड गाड्यांचा त्यात समावेश असेल. चाचणी केली जाईल. पहिल्या टप्प्यातील हायस्पीड टेस्ट ट्रॅकचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल. दुसरा टप्पा डिसेंबर 2014 पर्यंत पूर्ण होईल. चाचणी ट्रॅक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, रोलिंग स्टॉकसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची चाचणी सुविधा असलेला भारत हा जगातील पहिला देश ठरेल, हे विशेष! (Indian Railways)
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="ASC" orderby="post_date" view="list" /]
'वंदे भारत'चे हे ५ अभिमानबिंदू!
1 या रेल्वेचे डिझाईन तसेच तंत्र पूर्णपणे देशी (भारतीय) आहे.
2 पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सातत्याने
4 वर्षे सेवा देते आहे.
3 विदेशातील खर्चापेक्षा 60 टक्के कमी खर्चात ती बनते आहे.
4 विदेशात एका गाडीला 3 वर्षे लागतात. आपल्याला 18 महिने.
5 अपघात झाल्यास प्रवासी सुरक्षित राहतील, असा पुढील भाग.
रोलिंग स्टॉक म्हणजे काय?
आकडे बोलतात…
हायस्पीड टेस्ट ट्रॅक बनवण्याचा प्रकल्प एक चांगली सुरुवात आहे. 200 वर स्पीड मिळवायचा तर आपल्याला दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या प्रमुख मार्गांचेही ट्रॅक अपडेट करावे लागतील.
– सुधांशू मणी,
इनोव्हेटर, वंदे भारत एक्स्प्रेस