भारतीय नौदल ताफ्यात आज (दि.२६) आयएनएस इंफाळ दाखल होत आहे. 
Latest

चीनला भरणार ‘धडकी’! जाणून घ्‍या नवी युद्धनौका ‘INS इंफाळ’ विषयी…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय नौदल ताफ्यात आज (दि.२६) आयएनएस इंफाळ दाखल होत आहे. हिंद महासागरात चीनच्‍या कुरघोड्यांवर करडी नजर ठेवण्‍यासाठी आणि भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेला चालना देण्यासाठी ही युद्धनौका मोठी कामगिरी बजावणार आहे. जाणून घेवूया या युद्धनौकेविषयी…

INS Imphal : युद्धनौकेला प्रथमच ईशान्येकडील शहराचे नाव

INS इंफाळ ही २० ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडी अथवा नौदल तळाला देशाच्या ईशान्येकडील शहराचे नाव देण्याची ही पहिलीच घटना आहे. आयएनएस इंफाळ देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी देशाचा ईशान्य प्रदेश देखील महत्त्वाचा आहे, हे वस्तुस्थितीचे महत्त्व दर्शवते. मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळच्या नावावरून युद्धनौकेचे नाव देण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींनी 2019 मध्ये मान्यता दिली होती.

७५ टक्‍के स्‍वदेशी तंत्रज्ञान

INS इम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील चार विनाशकारी युद्धनौकांपैकी तिसरी आहे. ज्याची रचना भारतीय नौदलाची अंतर्गत संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे. या युद्धनौकेची बांधणी संरक्षण मंत्रालयाचे मुंबई येथील शिपयार्ड माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेडने (MDL) केली आहे. या युद्धनौकेच्‍या बाधणी  ७५ टक्के स्‍वदेशी तंत्रज्ञानाने केले आहे. आयएनएस इम्फाळ हे भूपृष्ठावरून जमिनीवर आणि जमिनीपासून हवेत मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसह तैनात आहे. याशिवाय यावर पाणबुड्यांना लक्ष्य करणाऱ्या रॉकेट लाँचर्स आणि ७६ मिमीच्या सुपर रॅपिड गनही बसवण्यात आल्या आहेत. ही युद्धनौका बराक 8 क्षेपणास्त्रे, रडार आणि टॉर्पेडोने सुसज्ज आहे.

INS Imphal : तब्‍बल ७४०० टन वजन

INS इंफाळची एकूण लांबी 535 फूट, उंची 57 फूट आणि एकूण वजन 7400 टन आहे. त्यावर ध्रुव आणि सी किंग हेलिकॉप्टरही तैनात केले जाऊ शकतात.

कोणत्‍याही हल्‍ल्‍याचा प्रतिकार करण्‍यास सक्षम

INN इंफाळ अण्वस्त्र हल्ला, जैविक हल्ला आणि रासायनिक हल्ल्याच्या परिस्थितीतही लढण्यास सक्षम आहे. यामध्ये संयुक्त वायू आणि गॅस प्रोपल्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ही युद्धनौका 30 नॉट्सच्या वेगाने पुढे जाण्यास सक्षम आहे.

भारतीय क्षमतेचे प्रतिबिंब

नौदलाने म्‍हटलं आहे की, आयएनएस इम्फाळ ही आतापर्यंत भारतात बांधलेली सर्वोत्कृष्ट युद्धनौका आहे. ती भारताच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. INS इंफाळ 20 ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्‍यात आली. यापूर्वी नौदलाने यशस्वी चाचणी घेतली. आता भारताच्‍या सारगी सुरक्षेमध्‍ये महत्त्‍वाची कामगिरी बजावण्‍यासाठी ही  युद्धनौका सज्ज झाली आहे.

हिंदी महासागरात भारतीय नौदलाच्‍या सामर्थ्यात भर

हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय नौदलही आपली क्षमता सतत वाढवत आहे. आयएनएस इम्फाळ नौदलात सामील झाल्याने भारतीय नौदलाच्‍या सामर्थ्यात भर पडली आहे. विशेष म्‍हणजे 19 मे 2017 रोजी ते 20 एप्रिल 2019 या कालावधीत INS इम्फाळची बांधणी झाली. सर्वात कमी वेळेत बांधणी झालेली ही युद्धनौका ठरली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT