Indian Navy : File Photo 
Latest

Indian Navy : भारताचे नौदल होणार अधिक सक्षम; नवीन एक आण्विक आणि दोन डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा होणार समावेश

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Indian Navy :  बदलत्या आंतरराष्ट्रीय युद्धनीतीनुसार भारतही आपल्या सैन्यदलामध्ये अत्याधुनिकता आणण्यास प्राधान्य देत आहे. गेल्या आठवड्यात आण्विक-सक्षम पाणबुडी आयएनएस अरिहंत INS Arihant मधून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर आता भारताच्या सामरिक क्षमता अधिक भक्कम होणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला आणखी एक आण्विक आणि दोन डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा समावेश करून याला मोठी चालना मिळणार आहे.

Indian Navy : INS सिंधुरत्नचा फेब्रुवारी २०१४ मध्ये मोठा अपघात झाला होता; ज्यामध्ये दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. ही पाणबुडी फेब्रुवारीमध्ये रशियातील सेवेरोडविन्स्क येथून अपग्रेड झाल्यानंतर मुंबईला परत येणार आहे. तसेच नौदलाची कालवरी या सिरीजमधील पाचवी नवी पाणबुडी दाखल होत असून २३ हजार कोटीचा हा प्रोजेक्ट 'माझगाव डॉक'मध्ये सुरु आहे. यामध्ये अत्याधुनिक सोनार सिस्टीम, अधिक क्षमतेचे सेन्सर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बऱ्याच नव्या सुविधा असणार आहेत. या सिरीजमधील; आयएनएस वेला' मागील वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये आपल्या मोहिमेवर गेली होती. जी ऑक्टोबर २०२२ मध्ये तब्बल साडेआठ महिन्याचे नवे रेकॉर्ड करून परत अली आहे.

Indian Navy : सध्या जगातील मोठे नौदल म्हणून चीन त्याच्या नौदलात अनेक सुधारणा करत असताना भारतानेही यामध्ये आपली कंबर कसली आहे. अनेक अत्याधुनिक पाणबुड्या आणि त्यावरील आण्विक क्षमतेची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तसेच आधुनिक तंत्रज्ञान यामुळे भारतही या स्पर्धेत आघाडीवर आहे.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT