पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवत आशिया खंडात क्रिकेटमध्ये आपणच 'किंग' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने १० विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव काेरलं आहे. १९८४ मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेत १० गडी राखून विजय मिळवला हाेता. (Asia Cup 2023)
सामन्याच्या सुरूवातीला श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत श्रीलंकेला ५० धावांवर रोखले. श्रीलंकेची फलंदाजी सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराहने कुसल परेराला बाद करत लंकेला पहिला धक्का दिला.
श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरूवात केली. इशान किशन आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागिदारी करत सामन्यात विजय मिळवला. यामध्ये इशान किशन १८ चेंडूमध्ये २३ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ चौकार लगावले. यासोबत शुभमन गिलने १९ चेंडूत २७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार लगावले. दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी नाबाद राहून भारताला सहज विजयी केले.
यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजने गोलंदाजी धुरा आपल्याकडे घेतली. सामन्याच्या चौथ्या षटकात चार विकेट घेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लंकेला बॅकफूटवर ढकलेले. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रम आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही. सिराजने एका षटकात ४ बळी टिपले. तत्पूर्वी, बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले होते. परेराला खातेही उघडता आले नाही.
यानंतर सामन्याच्या सहाव्या षटकातन मोहम्मद सिराजनेचौथ्या चेंडूवर श्रीलंकेला सहावा धक्का दिला. त्याने दसुन शनाकाला क्लीन बोल्ड केले. शनाकाला आपले खाते ही उघडता आले नाही. सिराजने सामन्यात चार धावा देत लंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. सामन्याच्या १२ व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने लंकेला मेंडिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला. एका बाजून विकेट जात असताना संयमी खेळी करणाऱ्या मेंडिसला सिराजने क्लीन बोल्ड केले.
श्रीलंकेला 13व्या षटकात 40 धावांवर आठवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने दुनिथ वेलाल्गेला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. वेल्लावागे 21 चेंडूत आठ धावा करता आल्या. 13 षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आहे. सामन्यात १६ वे षटक करण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याने आपल्या षटकात सलग दोन विकेट घेत लंकेचा डाव गुंडाळला. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रमोद मधुशन तर दुसऱ्या चेंडूवर पाथिरानाला बाद केले. दोन्ही फलंदाजांनी अनुक्रमे १ आणि ० धावा केल्या.
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 1 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारताने ही स्पर्धा वनडेमध्ये सात वेळा आणि टी-20मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेने वनडेमध्ये पाच वेळा आणि टी-20मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.
हेही वाचा ;