Latest

अर्थसंकल्‍पापूर्वी दिलासा..: जीडीपी दर 6.1 इतका राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात 'आयएमएफ'ने भारताचा चालू आर्थिक वर्षासाठीचा जीडीपी दराचा अंदाज घटविला आहे. याआधी 6.8 टक्के इतका जीडीपी दराचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्या तुलनेत आता 6.1 टक्के इतका जीडीपी दर राहील, असे आयएमएफने म्हटले आहे. यंदा भारताला काही प्रमाणात मंदीचा फटका बसण्याची शक्यता असली तरी जगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था कितीतरी सुसि्थतीत आहे, असेही आयएमएफने ताज्या अहवालात म्हटले आहे.

वर्ष 2022 मध्ये जागतिक जीडीपी दर 3.4 टक्के अंदाजाच्या तुलनेत 2.9 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. तर 2024 साली हा दर 3.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. वर्ष 2023 मध्ये चीनचा विकासदर 5.2 टक्के इतका राहण्याची शक्यता असल्याचेही आयएमएफने म्हणणे आहे. वर्ष 2024 मध्ये चीनचा विकास दर 4.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.

वाढत्या महागाईमुळे जागतिक विकासाला ब्रेक लागला होता. मात्र आता परिसि्थती पूर्वपदावर येत आहे. पुढील आर्थिक वर्षात महागाई आटोक्यात येण्याची शक्यता आहे. गतवर्षी विकसनशील देशांचा सरासरी महागाई दर 9.9 टक्के इतका होता. यंदा हा दर 8.1 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. तर पुढील वर्षी हाच दर घसरुन साडेपाच टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. विकसनशील देशांच्या जीडीपीच्या अंदाजावर नजर टाकली तर चालूवर्षी या देशांचा जीडीपी दर चार टक्के इतका राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT