Latest

Covid-19 updates : कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासांत ५८ हजार नवे रुग्ण, ६५७ जणांचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Covid-19 updates : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus cases) घट झाली आहे. तसेच मृत्यूंचे प्रमाणही (Covid deaths) कमी झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ हजार ७७ नवे रुग्ण आढळून आले. तर ६५७ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १ लाख ५० हजार ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात ६ लाख ९७ हजार ८०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी रेट ३.८९ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ७ हजार १७७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

याआधीच्या दिवशी ६७ हजार ५९७ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, १ हजार २४१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ६७ हजार ८८२ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. याआधीच्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ४ हजार २८१ ने घट नोंदवण्यात आली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.९५ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ४.४४ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्ग दर ६.५८ टक्के नोंदवण्यात आला होता.

कोरोनाच्या उद्रेकानंतर ५७ लाख लोकांचा बळी, अमेरिकेत सर्वांधिक

दरम्यान एका वृत्तानुसार, डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाने (Covid-19 updates) जगभरात सुमारे ५७,७५,५१६ लोकांचा बळी घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. अमेरिकेत सर्वांधिक ९ लाख १२ हजार २५५ जणांचा, ब्राझीलमध्ये ६ लाख ३५ हजार ७४ जणांचा आणि ३ लाख ३८ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

परदेशातून येणाऱ्यांना आरटी-पीसीआरची सक्ती रद्द

विदेशातून येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर अहवाल (७२ तास वैधता) घेऊन येण्याची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. कोविड संदर्भातील नवी मार्गदर्शक तत्वे सरकारने गुरुवारी जारी केली, त्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना देशात प्रवेश दिला जाणार आहे. सरकारने ओमायक्रॉन रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या देशांसाठीचे 'ऍट रिस्क' मार्किंग देखील हटविले आहे. भारतात आल्यानंतर प्रवाशांना 'रँडम सॅम्पल' देऊन विमानतळावरून बाहेर पडता येईल. एअर सुविधा पोर्टलवर ज्या प्रवाशांनी सेल्फ डिक्लरेशनच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहिती भरलेली आहे, तसेच आरटी-पीसीआर अहवाल किंवा दोन्ही डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले आहे, अशा प्रवाशांनाच विमान कंपन्या बोर्डिंगची परवानगी देतील.

देशातील बूस्टर डोसची स्थिती

श्रेणी….बूस्टर डोस
आरोग्य कर्मचारी…३७,७४,६०५
फ्रंटलाईन वर्कर्स…५०,६८,८६०
६० वर्षांहून अधिक…७२,७२,३०३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT