Latest

Mohan Bhagwat : भारत गेल्या ५ हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष : सरसंघचालक मोहन भागवत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : "भारत" हे ५,००० वर्षांपासून एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संपूर्ण जग एक कुटुंब आहे, ही आपली भावना आहे. हा सिद्धांत नाही. जाणून घ्या, समजून घ्या आणि मग त्यानुसार वागा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी (दि.१२) विधान करत लोकांनी एकजूट राहण्याचे आणि मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर मांडण्याचे आवाहन केले. ( Mohan Bhagwat)

Mohan Bhagwat : आम्ही मातृभूमी मानतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगा हरी यांनी लिहिलेले 'पृथ्वी सूक्त – अॅन ओड टू मदर अर्थ' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रम बुधवारी (दि११) पार पाडला. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना संरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवण्याचे आवाहन केले. पुढे बोलत असताना ते म्हणाले, "आम्ही मातृभूमी मानतो, आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा एक आवश्यक घटक म्हणून. "आपली ५,००० वर्षे जुनी संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे. सर्व 'तत्वज्ञान' मध्ये हा निष्कर्ष आहे. संपूर्ण जग एक कुटुंब आहे, ही आपली भावना आहे. हा सिद्धांत नाही. ते जाणून घ्या, ओळखा आणि मग त्यानुसार वर्तन करा,

जगाच्या कल्याणासाठी द्रष्ट्यांनी 'भारत' निर्माण केला

भागवत बोलत असताना असेही म्हणाले की,"देशात खूप विविधता आहे. एकमेकांशी भांडू नका. आपल्या देशाला आपण एक आहोत हे जगाला शिकवण्यास सक्षम बनवा, भारताच्या अस्तित्वाचा हा एकमेव उद्देश आहे." पुढे बोलत असताना म्हणाले, की, जगाच्या कल्याणासाठी द्रष्ट्यांनी 'भारत' निर्माण केला. त्यांनी एक समाज निर्माण केला. या समाजाने त्यांचे ज्ञान देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले. ते फक्त 'संन्यासी' नव्हते. ते आपल्या कुटुंबासह भटक्यांचे जीवन जगत होते. हे सर्व 'घुमंटू' (भटके) आजही तिथे आहेत ज्यांना इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून घोषित केले होते. ते बर्‍याचदा आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवताना दिसतात. पुढे बोलताना म्हणाले, "आमचे लोक मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत ज्ञान घेऊन जगभर गेले आहेत." .

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT