Latest

India Beat Pakistan In T20 World Cup 2022 : मला तुझा अभिमान वाटतो विराट – अनुष्का शर्मा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'न भूतो न भविष्यति' अशा प्रकारचा थरारक क्रिकेट सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दरम्यान पाहण्यास मिळाला. ह्रदयाचे ठोके देखील थांबवतील अशा अनेक उत्कंठापूर्ण चढ-उतारांच्या क्षणांनी भरलेल्या अशा अतितटीच्या सामन्यात अखेर भारताने पाकिस्तानला चितपट केले. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली (Virat Kohli). त्याच्या संयमी आणि प्रसंगी आक्रमक अशा अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताला हा विजय संपादन करता आला. आज पर्यंतच्या खेळीतील कदाचित ही सर्वोत्त्कृष्ट खेळी ठरेल अशी कामगिरी विराटने केली. या त्याच्या खेळीवर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने (Anushka Sharma) भावूक पोस्ट शेअर करत 'मला तुझा अभिमान वाटतो' असे म्हटले आहे. (India Beat Pakistan In T20 World Cup 2022)

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताकडून जी कामगिरी विराट कोहलीने बजावली आहे, त्याचा अनुष्कालाच काय तर अवघ्या प्रत्येक भारतीयाला विराटचा अभिमान वाटेल. त्याच्या झुंजार खेळीने अशक्यप्राय विजय मिळवून दिला. तो 53 चेंडूत ८३ धावा करत अखेर पर्यंत नाबाद राहिला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. ३१ धावांवर ४ बाद अशी बिकट अवस्था भारताची झालेली असताना हार्दीक पंड्याच्या सहाय्याने भारताला विजय मिळवून देण्याची किमया विराटने साधली. विराटच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक अशी आजची विशेष खेळी होती. सर्व भारतीय विराटच्या या कामगिरीचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. यामध्ये त्याची पत्नी अनुष्का देखील सहभागी झाली अन् आजचा हिरो ठरलेल्या आपल्या नवऱ्याचे तिने तोंडभरुन कौतुक केले. (India Beat Pakistan In T20 World Cup 2022)


अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे. ती या पोस्ट मध्ये म्हणते आहे, 'लोकांच्या आयुष्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुझ्या खेळीने एक नवा प्रकाश आणि नव चैतन्य आणले आहे. तुझी एकाग्रता आणि जिद्द आणि स्वत:च्या कामगिरीवरचा विश्वास केवळ भन्नाट आहे. मी आज माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला आहे. आपली आई अशी का डान्स करत आहे, ओरडत आहे आणि जल्लोष करत आहे, हे कळण्याच्या वयात आपली मुलगी नाही. पण, ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला कळेल, की तिच्या बाबाने त्या दिवशी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती. तिही त्याच्यासाठी खडतर ठरलेल्या काळानंतर. कठीण परिस्थितीला जिगरबाज वृत्तीने तोंड देत त्याने ही कामगिरी करुन दाखवली. मला तुझा अभिमान वाटतो विराट. तुझ्यावर प्रेम करतच राहिन. आनंदातही आणि संघर्षाच्या काळातही. (India Beat Pakistan In T20 World Cup 2022)


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT