Latest

IND vs WI 2nd ODI : अक्षर पटेल ठरला नवा सिक्सर किंग, धोनीचे १७ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड तोडले!

दीपक दि. भांदिगरे

पोर्ट ऑफ स्पेन; पुढारी ऑनलाईन : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs WI 2nd ODI) वेस्ट इंडिजचा २ विकेट्सनी पराभव केला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा युवा ऑलराउंडर अक्षर पटेल (Axar Patel) या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने झुंजार अर्धशतकी खेळी केली. सामना जिंकण्यासाठी ३१२ धावांचा पाठलाग करताना भारताने ३८.४ ओवरमध्ये २०५ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी भारताला ७४ चेंडूत ११४ धावांची गरज होती. यातच फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अक्षर पेटलने ३५ चेंडूत ६४ धावांची खेळी करत टीमला २ विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

अक्षर पटेलने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी करत २७ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने वनडे करियरमधील पहिले अर्धशतके पूर्ण केले. तसेच तो वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. तसेच नवा सिक्सर किंग ठरला आहे.

पटेलला पाच वर्षाच्या कालावधीनंतर टीम इंडियासाठी खेळायला मिळाले. त्याने मिळालेली संधी सोडली नाही आणि मॅच विनिंग अर्धशतकी खेळी करत सामना जिंकून दिला. तुफानी खेळीमुळे अक्षर मॅन ऑफ द मॅच ठरला. ३५ चेंडूत नाबाद ६४ धावांच्या खेळीसोबतच त्याने १ विकेट घेतली. अक्षरने या धमाकेदार खेळीमुळे एमएस धोनी आणि युसूफ पठाणचे एक रेकॉर्ड तोडले. धोनीने २००५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत ३ षटकार ठोकत टीमला विजय मिळवून दिला होता. युसूफ पठाण याबाबत धोनीच्या बरोबरीला होता. पठाणने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध वनडे मॅचमध्ये ३-३ षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला होता.

IND vs WI 2nd ODI वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय विंडीजच्या शाय होप आणि कायेल मेयर्स या सलामी जोडीने सार्थ ठरवत ६५ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी विंडीजला पाठोपाठ धक्के देत विंडीजची अवस्था ३ बाद १३० धावा अशी केली. मेयर्स ३९ तर ब्रुक्स ३५ आणि किंग शून्यावर बाद झाला. दीपक हुड्डा, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र, त्यानंतर शाय होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची शतकी भागीदारी रचत संघाला २५० चा टप्पा पार करून दिला. दरम्यान, शाय होपने आपले १३ वे वन डे शतक ठोकले. विशेष म्हणजे शाय होपने आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकले. होपने १३५ चेंडूंत ११५ धावा केल्या. यात त्याने ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. होपने कायेल मेयर्स आणि शमराह ब्रुक्स यांच्या सोबत अनुक्रमे ६५ आणि ६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर होप आणि कर्णधार निकोलस पूरन या दोघांनी ११७ धावांची भागीदारी केली. दरम्यान, शार्दुल ठाकूरने पूरनला ७४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शार्दुल ठाकूरने रोव्हमन पॉवेलला १३ तर ४९ व्या षटकात शाय होपला ११५ धावांवर बाद केले. मात्र, तोपर्यंत विंडीजने ३०० धावांचा टप्पा पार केला होता. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३ विकेटस् घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT