Shardul Thakur : ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून शार्दुल ठाकूरने रचला इतिहास! 
Latest

Shardul Thakur : ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून शार्दुल ठाकूरने रचला इतिहास!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोहान्सबर्गमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात करिष्माई गोलंदाजी केली. त्याने यजमान संघाच्या ७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कसोटीत ५ व त्याहून अधिक विकेट घेण्याची शार्दुलची ही पहिलीच वेळ आहे. शार्दुलला पहिल्या डावात ६१ धावांत ७ बळी घेण्यात यश आले. असे करून त्याने ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आता मायदेशात आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. २१ व्या शतकात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कोणा परदेशी गोलंदाजाचा सर्वोत्तम विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. शार्दुलच्या आधी भारताबाहेर सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन कपिल देव आणि इरफान पठाणच्या नावावर होते. कपिलने १९८५ मध्ये अॅडलेडमध्ये १०६ धावा देत ८ विकेट घेतल्या होत्या. तर इरफान पठाणने २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ५९ धावा देत ७ बळी घेतले होते.

दक्षिण आफ्रिकेत शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) आपल्या गोलंदाजीने इतिहास रचला. तो दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने हरभजन सिंगचा विक्रम मोडला. हरभजन सिंगने २०१०-११ मध्ये केपटाऊनमध्ये १२० धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या, पण आता शार्दुलने या जोहान्सबर्ग कसोटीत ६१ धावा देवून ७ बळी मिळवले.

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत शार्दुलची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. ठाकूरने या सामन्यात ६१ धावांत ७ बळी घेतले. यापूर्वी १९९२ मध्ये अॅलन डोनाल्डने पोर्ट एलिझाबेथ कसोटीत ८४ धावांत ७ विकेट घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे टॉप ५ गोलंदाज..

७/६१- शार्दुल ठाकूर- जोहान्सबर्ग- २०२१/२२

७/१२०- हरभजन सिंग- केप टाउन- २०१०/११

६/५३- अनिल कुंबळे- जॉबर्ग- १९९२/९३

६/७६- जवागल श्रीनाथ- पोर्ट एलिझाबेथ- २००१-०२

६/१३८- रवींद्र जडेजा- डर्बन- २०१३/१४

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीच्या एका डावात सर्वोत्तम कामगिरी करणारे अव्वल ४ भारतीय गोलंदाज-

७/६१- शार्दुल ठाकूर- जोहान्सबर्ग- २०२१/२२

७/६६- आर अश्विन- नागपूर- २०१५/१६

७/८७- हरभजन सिंग- कोलकाता- २००४-०५

७/१२०- हरभजन सिंग- केप टाउन- २०१०/११

वांडरर्स येथे एका कसोटी डावात पाच विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

शार्दुल ठाकूर, ७/६१, २०२१

अनिल कुंबळे, ६/५३, १९९२

मुहम्मद शमी, ५/२८, २०१८

एस श्रीशांत, ५/४०, २००६

जसप्रीत बुमराह, ५/५४, २०१८

जवागल श्रीनाथ, ५/१०४, १९९७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT