IND vs SA 2nd T-20 
Latest

IND vs SA 2nd T-20 : दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे मालिकेतील दुसरा टी-२० सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. ऋषभ पंत भारतीय संघात तीन मोठे बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेइंग इलेवन मधून बाहेर काढत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.  (IND vs SA 2nd T-20)

'या' अष्टपैलू खेळाडूला मिळू शकते संधी 

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अक्षर पटेलने अतिशय खराब कामगिरी केली होती. गोलंदाजीमध्ये अक्षर पटेलची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याने ४ षटकांमध्ये ४० धावा देत फक्त १ विकेट पटकावली. त्यामुळे ऋषभ पंत अक्षर पटेलला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरला संधी मिळू शकते.

हा फिरकीपटू जाणार बाहेर  (IND vs SA 2nd T-20)

आयपीएल २०२२ मध्ये यजुवेंद्र चहल सर्वांत जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाज होता. चहलने आयपीएलमध्ये २६ विकेट्स आपल्या नावावर केला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात यजुवेंद्र चहलची कामगिरी खराब राहिली. चहलने २ षटकांमध्ये २६ धावा दिल्या. तसेच एकही विकेट पटकावू शकला नाही. यजुवेंद्र चहच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळू शकते.

आयपीएल २०२२ मध्ये उमरान मलिकने दमदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली हाेती. उमराने १४ सामन्यांमध्ये २२ विकेट्स पटकावल्या होत्या. सनराइजर्स हैदराबादच्या गोलंदाजीमध्ये उमरान मलिकने महत्वपूर्ण कामगिरी केली होती. राहुल द्रविड यांनीही उमरानचे कौतुक केले होते. उमरान मलिकला आवेश खानच्या जागी संधी मिळू शकते. ( IND vs SA 2nd T-20 )

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT