पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकामध्ये आज भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने असणार आहेत. आशिया कप मधील हा दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात आज 'अ' गटातील दोन संघ आज आमने-सामने असणार आहेत. दरम्यान आजच्या सामन्यासाठी रविचंद्रन अश्विन आणि रिषभ पंत या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. याऐवजी वेगवान गाेलंदाज आवेश खान आणि अर्शदीप सिंह यांना संधी देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, यजुवेंद्र चहलबाबर
आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, असिफ अली, शाहबाद खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रॉफ, शाहनवाज दहानी