Latest

IND vs NZ 2nd ODI : जबरदस्‍त … सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार पाहिला का? (व्‍हिडीओ)

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्‍या तुफान फॉर्ममध्‍ये आहे. ३६० डिग्री फलंदाज, अशीही त्‍याची नवी ओळख निर्माण झाली आहे. न्‍यूझीलंड विरुद्‍धचा दुसर्‍या वन डे सामन्‍यावेळी त्‍याची ही ओळख सार्थ ठरविणारा एका षटकाराचा व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे. ( IND vs NZ 2nd ODI )

हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4.5 षटकांपर्यंत 22 धावा केल्या असताना पावसाला सुरुवात झाली. अखेर 3 तास 47 मिनिटांनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. हा सामना 29-29 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर 8 षटकांचा खेळ झाला. तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाल्‍याने सामना रद्द करण्यात आला. या सामन्‍यात सूर्यकुमार यादवने न्‍यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर ठोकलेला षटकार हा स्‍मरणीय ठरला.

IND vs NZ 2nd ODI : सूर्यकुमारच्‍या षटकाराचा व्‍हिडीओ व्‍हायरल

दुसर्‍या वन डे सामन्‍यातील ११ व्‍या षटकामध्‍ये फिरकीपटू मिचेल सॅटनरच्‍या दुसर्‍या चेंडूवर सूर्यकुमार यादव याने जबरदस्‍त षटकार ठोकला. सूर्यकुमारचा फटका पाहून मिचेल सॅटनरही काही वेळ अवाक झाला. सूर्यकुमारने गुडखा टेकून मिड ऑनच्‍या वरुन थेट प्रेक्षकांमध्‍येच चेंडू मारला. या अफलातून षटकाराचा व्‍हिडीओ सध्‍या मोठ्‍या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT