Latest

Shubman Gill: शुबमन गिलचा ‘बुलेट’ चौकार, पण चाहत्यांनी केला ‘सचिनss.. सचिनss’चा जयघोष (Video)

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : न्यूझीलंडच्या पहिल्या डावात दुखापत झालेला शुभमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या डावात मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला. त्याच्या खेळी दरम्यान, जेव्हा या खेळाडूने चौकार मारला. तेव्हा चाहत्यांनी सचिनss.. सचिनss.. असा जयघोष केला. हा व्हिडिओला सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सचिन जेव्हा वानखेडेवर खेळायचा, तेव्हाही त्याच्या नावाचा जयघोष व्हायचा. मैदानावरचं वातावरण भारावून गेलेलं असायचं.

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरला निवृत्ती घेऊन अनेक वर्ष लोटली आहेत. पण तो आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी याचा प्रत्यय आला. विशेष म्हणजे ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा टीम साऊदीच्या एका चेंडूवर शुभमन गिलने चौकार चेंडू सीमापार भिरकावला. त्यावेळी विराट कोहलीही गिलसोबत (Shubman Gill) मैदानात होता.

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील ३७ व्या षटकातीच्या पहिल्या चेंडूवर गिलने (Shubman Gill) चौकार ठोकला. चेंडू बुलेटच्या वेगाने सीमारेषेच्या पलिकडे गेला. यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एक जल्लोष केला. ते 'सचिनsss.. सचिनsss' असा जयघोष करू लागले. दुसऱ्या डावात शुभमन गिल ७५ चेंडूत ४७ धावा काढून बाद झाला. त्याची विकेट रचिन रवींद्रने घेतली. पहिल्या डावातही गिल ४४ धावांवर बाद झाला होता. गिल आणि कर्णधार कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४४ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली. गिलला बऱ्याच दिवसांपासून कोणतीही मोठी इनिंग खेळता आलेली नाही. तो सामन्यात चांगली सुरुवात करतो, पण त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर पाकिस्तान विरुद्ध ढाका येथे १८ मार्च २०१२ मध्ये झालेल्या सामन्यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटला बाय बाय केले होते. तसेच १ डिसेंबर २००६ रोजी द. आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील मैदानावर सचिनने टी २० क्रिकेटचा पहिला आणि शेवटचा सामना खेळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT