पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमीरात सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारताने अफगानिस्तानवर १०१ धावांनी विजय मिळवला. अफगानिस्ताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावसंख्येत रोखण्याचा अफगानिस्ताचा डाव होता. मात्र विराट कोहलीने ६१ चेंडूमध्ये 122 धावांची दमदार शतकी खेळी करत भारताची धावसंख्या २०० पार नेली. विराट सोबतचं के. एल. राहुलने ४१ चेंडूमध्ये ६२ धावांची दमदार खेळी केली. विराट आणि के.एल. राहुल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांअखेर २१२ धावा केल्या. (IND vs AFG)
भारताने २१३ धावांचे आव्हान दिल्यानंतर अफगानिस्तानचा संघ २० षटकांअखेर १११ धावा करू शकला. भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यासमोर अफगानिस्तानचा संघ अक्षरश: ढेपाळला. भुवनेश्वर कुमारने त्याच्या ४ षटकांमध्ये ५ विकेट्स पटकावत फक्त ४ धावा दिल्या. तर अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. (IND vs AFG)
अफगानिस्तानकडून इब्राहिम जारदानने ५९ चेंडूमध्ये ६४ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. भारताने हा मोठा विजय मिळवला असला तरी भारताचे आशिया चषक स्पर्धेतील आव्हान यापुर्वीच संपुष्टात आले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी यापुर्वीचं धडक मारली आहे. (IND vs AFG)
टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अखेर शतक झळकावले. आपल्या 70 व्या ते 71व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्याने 1020 दिवस प्रतिक्षा पहायला लावली. ही प्रतीक्षा लांबत चालली होती, पण 8 सप्टेंबर 2022 रोजी त्याने शतक फटकावले तेही नाबाद. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक असले तरी विराटच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71वे शतक ठरले आहे. (IND vs AFG)