परराष्ट्रमंत्री एस जयशंकर 
Latest

IND Foreign Minister S Jaishankar : जगाला भारताचे सामर्थ्य कळाले : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानकडून वारंवार निर्माण केलेला दहशतवाद आणि चीनची सीमेवरून होणारी घुसखोरी याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावरून संपूर्ण जगाला आता भारताचे सामर्थ्य कळाले, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. शनिवारी (दि.१४) तामिळ साप्ताहिक 'तुघलक' च्या ५३ व्या वर्धापनदिन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्‍यांनी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय दलाकडून बालाकोट हवाई हल्ल्याद्वारे दहशतवादाला प्रत्युत्तर दिले. या माध्यमातून भारताने जगाला दिलेल्या संदेशाचीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.

जयशंकर म्हणाले की, "भारत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने शक्य ती सर्व पावले उचलणार आहे.  उत्तरेकडील सीमेवरून चीनचे सैन्य  आमच्या सीमांचे उल्लंघन करून त्‍या ठिकाणी स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत होते.  कोविडची परिस्थिती असूनही या घटनांविरोधी आमचे प्रत्युत्तर मजबूत होते. आजही देशाच्या सीमांवर हजारोंच्या संख्येने सैनिक तैनात आहेत. जे कठीण प्रदेशात, पूर्ण तयारीनिशी आमच्या सीमांचे रक्षण करत आहेत."

राष्ट्रीय समृद्धीला अनेक पैलू आहेत. मात्र राष्ट्रीय सुरक्षा हा याचा निःसंशयपणे मूलभूत पाया आहे. या संदर्भात सर्वच देशांची परीक्षा घेतली जाते. दहशतवाद, सीमेवरील घुसखोरी अशा अनेक समस्या आमच्यासमोर होत्या. मात्र बालाकोट एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर खूप महत्त्वाचा संदेश अवघ्या जगाला भारताने दिला आहे. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली नसती तर जगातील सर्वात मोठा देश हा चीन नसून भारत असता, असेही या वेळी  परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्‍हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT