Latest

Income tax : यंदा कर किती भरावा लागणार?

मोहन कारंडे

प्राप्तिकराच्या पोर्टलवर नव्या आर्थिक वर्षात किती कर द्यावा लागेल, हे आता समजणार आहे. सर्व करदात्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. यानुसार प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर आपल्याला कोणती करप्रणाली निवडायची आहे आणि किती कर भरावा लागेल, हे समजणार आहे.

संबंधित बातम्या : 

प्रथमच आयटीआर भरणार्‍या मंडळींना प्राप्तिकर विवरण भरणे कदाचित कंटाळवाणे काम वाटू शकते. यादरम्यान जुनी करव्यवस्था आणि नवीन कर व्यवस्थेची निवड करताना संभ्रम निर्माण होऊ शकतो; पण या सर्व समस्यांचे समाधान आणि आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एक ऑनलाईन टॅक्स कॅलकुलेटर आणले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये टॅक्स कॅलकुलेटर लाँच केले. यानुसार कोणता टॅक्स रिझिम चांगला आहे, जुना की नवीन हे निश्चित करण्यासाठी आणि बचतीला मदत करण्यासाठी टॅक्स कॅलकुलेटर उपयुक्त ठरते.

ऑनलाईन टॅक्स कॅलकुलेटर हे संभाव्य कराचे आकलन करण्यासाठी आणि त्याचा आकडा सांगण्यासाठी निश्चित केले आहे. हे करदात्यांसाठी एक टूल म्हणून काम करते. यात उत्पन्न, कपात, टॅक्स क्रेडिटच्या आधारावर कर किंवा संभाव्य रिफंडची रक्कम समजण्यास मदत मिळते.

कॅलकुलेशन करणे का गरजेचे

प्राप्तिकराचे आकलन करणे हे आर्थिक नियोजनासाठी खूपच गरजेचे आहे आणि ते प्रभावीपणे बजेट तयार करणे, खर्च निश्चित करणे आणि त्यानुसार बचतीला प्रोत्साहन देण्याचे काम करते.

कशी आकडेमोड होते

टॅक्स कॅलकुलेटर सध्या प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर सक्रिय आहे. यासाठी सर्वात अगोदर खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. (https://incometaxindia.gov.in/pages/tools/income-tax-calculator.aspx) यावर लॉग इन करा. यानंतर आपल्याला विवरण भरावे लागेल.

करदात्याचे स्वरूप

  • पुरुष/महिला/ज्येष्ठ नागरिक/अतिज्येष्ठ नागरिक
  • रेसिडेन्शिअल स्टेटस
  • सॅलरी आणि स्पेशल रेंट इन्कम आणि अन्य स्रोत

प्रॉपर्टीवर व्याज

80 सीसीएच (2), 80 सीसीडी (2), 80 जेजेएए आणि कलम 5757 (आयआयए) नुसार कौटुंबिक निवृत्ती वेतनापोटी दिली जाणारी प्राप्तिकरावरील कपात ही दोन्ही व्यवस्थेत देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य कपात किंवा सवलत ही नव्या करप्रणालीत दिली जात नाही. टॅक्स कॅलकुलेटरचा उद्देश हा लोकांना फंडामेंटल टॅक्स कॅलकुलेशनपर्यंत नेण्याचा आहे; परंतु प्राप्तिकर विभाग हा या टूलद्वारे समोर आलेली आकडेवारी ही अचूक आहे, याचा दावा करत नाही.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT