पनवेल, पुढारी प्रतिनिधी : राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यांत छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) १०० सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवायांमध्ये पनवेलमध्ये सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे.
देशभरातील १० राज्यांत एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे. एनआयए आणि ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरुळ येथील पीएफआयच्या कार्यालयात रात्री ३ च्या सुमारास छापेमारी केली आहे. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांत नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरूळमधून ४ जणांना तर पनवेलमधून एकाला ताब्यात घेतले आहे.
हे वाचलंत का ?