Latest

IMF’s GDP Forecast About India : भारताचा २०२२ चा जीडीपी घटणार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिले संकेत

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (IMF's GDP Forecast About India) भारताचा चालू वर्षांचा अर्थात २०२२ चा सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) हा ६.८ टक्के इतका राहिल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच जागतिक आर्थिक मंदीची स्थिती पाहता आणखी घसरण शक्य असल्याचे देखील अनुमान केले आहे. या पुर्वी आयएमएफने भारताचा जीडीपी हा ७.४ टक्के इतका राहिल असा सांगितला होता. तर या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी त्यांनी हा आकडा ८.२ टक्के इतका राहिल असे भाकित केले होते. तर २०२१ – २२ या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी हा ८.७ टक्के इतका होता.

आंतराराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (IMF's GDP Forecast About India) जगभारतील आर्थिक स्थितीबाबतचा एक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. या ताज्या अहवालानुसार या सालातील भारताचा जीडीपी हा ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमएफनेच जुलैमध्ये वर्तविलेल्या अंदाजापेक्षा सध्या सांगितलेला अंदाज हा ०.६ टक्क्यांनी कमी आहे. याचा अर्थ दुसऱ्या तिमाहीमध्ये आर्थिक उलाढाली मंदावल्याच्या आणि बाह्य मागणीत घट झाल्याचा इशारा हा अंदाज स्पष्टपणे देतो.

या आधी जागतिक बँकेसह (World Bank) इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचा जीडीपी घसरणार असल्याचे सांगितले होते. जागतिक बँकेने मागील आठवड्यात भारताचा जीडीपी ७.५ टक्क्यांऐवजी ६.५ इतका राहिल असे सांगितले होते. (IMF's GDP Forecast About India)


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT