Latest

IMD Chief M Mohapatra : जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदी मृत्युंजय महापात्रा यांची निवड

अमृता चौगुले

जिनेव्हा (स्वित्झर्लंड); पुढारी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) (India Meteorological Department) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटना (WMO) (World Meteorological Organisation) चे तिसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. WMO ने ट्विट करून ही माहिती दिली. महापात्रा व्यतिरिक्त, इतर दोन व्यक्तींना देखील WMO च्या उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली, आयर्लंडमधील मेट इरिअनचे संचालक इऑन मोरान आणि कोट डी'आयव्हॉरचे हवामानशास्त्र संचालक दौडा कोनाटे यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे.(IMD Chief M Mohapatra)

मृत्युंजय महापात्रा (Mrutyunjay Mohapatra) मूळचे ओडिशाचे असून त्यांना भारताचे साइक्लोन मॅन म्हणून ओळखले जाते. मृत्युंजय महापात्रा यांना या पदाच्या निवडणुकीत एकूण १४८ मतांपैकी ११३ मते मिळाली. ते २०१९ पासून देशातील सर्वोच्च हवामान कार्यालयाचे प्रमुख आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, पृथ्वी विज्ञान सचिव एम रविचंद्रन यांची अंटार्क्टिक ट्रीटी कन्सल्टेटिव्ह मेकॅनिझम (ATCM) चे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. (IMD Chief M Mohapatra)

WMO मध्ये एक अध्यक्ष आणि तीन उपाध्यक्ष असतात जे जागतिक हवामानशास्त्र काँग्रेस आणि कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष असतात. सचिवालयाचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. अर्जेंटिनाच्या प्रा. सेलेस्टे साऊलो यांची WMO च्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिनिव्हा येथे गुरुवारी झालेल्या WMO निवडणुकीत, UAE च्या राष्ट्रीय हवामान केंद्राचे संचालक अब्दुल्ला अल मंडौस यांची चार वर्षांच्या कालावधीसाठी WMO च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT