file photo 
Latest

Silver Prices Fall : चांदी दरात आठ दिवसात 7 हजाराची घसरण; हुपरीसह 10 गावांत चिंतेचे वातावरण

निलेश पोतदार

हुपरी : अमजद नदाफ चांदी दरात गेल्या काही दिवसांत जोरदार घसरण चालू असून, दर कमी झाल्यामुळे देवघेवीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या आठवड्यात विक्रमी वाढणारा दर या आठवड्यात नीचांकी पातळीवर आहे. गेल्या आठच दिवसात  चांदी दरात 7 हजार रुपयांची घट झाली आहे. चांदी दरातील घसरणीमुळे या भागातील हस्तकला उद्योग हवालदिल झाला आहे.

आंतराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी व फेडरल बँकेतील विविध निर्णय याचा परिणाम चांदी दरावर होत असल्याचे बोलले जात आहे. हुपरी परिसरातील चांदी उद्योगात दरातील चढ-उतार परिणामकारक असतात, ग्राहकांना दर कमी झाले कि, फायदा जरी होत असला, तरी कमी किमतीत दागिने मिळत असले तरी उद्योजक, धडी उत्पादक यांच्यासाठी हि घसरण डोकेदुखी आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बोलबाला आहे. या वस्तूत चांगली विद्युत वाहक महणून चांदीचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून चांदीला भाव आला आहे.
आठ दिवसांपूर्वी चांदीचा दर तेजीत होता. हा दर 29 सप्टेंबरला 73,200 वर पोहोचला होता. तर सध्या दर घसरत चालला आहे. सध्याचा दर 66500 पर्यंत आला आहे. त्यामुळे या भागात देवघेवीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

चांदी-सोने दरातील घट हि चिंतेची बाब आहे, दर कमी झाले कि ग्राहकांना त्याचा फायदा होतो परंतु आणखी दर कमी होतील म्हणून ग्राहक थांबतो. त्यामुळे व्यवहार ठप्पच होतात. चांदीच्या बाबतीत पहिले कि चांदी उद्योगात त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. परिणामी उद्योग मंदीत जातो. याचा मोठा फटका परिसरातील चांदी उद्योगाबरोबरच अन्य उद्योगनांही बसतो. त्यामुळे तूर्तास हि घसरण अजून कुठंपर्यंत येते हे पाहणे महत्वाचे आहे.

गेल्या आठ दिवसांत चांदीच्या दरात सात  हजार रुपयांची घसरण झाली आहे, ही उद्योगाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अमेरिकेतील फेडरल बँकेच्या वाढीव व्याजदर लवकर कमी न करण्याच्या निर्णयाचा परिणाम आणी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे चांदीचा दर घसरत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT