Latest

Hupari Crime : हुपरीतील ‘त्या’ जागेवरील अतिक्रमण हटवले, पोलिसांचा मोठा फौजफाटा

backup backup

हुपरी; अमजद नदाफ : हुपरी हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ या वादग्रस्त सरकारी कब्जात असलेल्या जमिनीवरुन वाद सुरू होता. या प्रकरणी येथील समस्त चर्मकार समाजाच्यावतीने गेल्या चाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. (Hupari Crime)

यावेळी पोलीस महसूल विभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईत या ठिकाणचे सर्व अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे. यावेळी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजताच हुपरी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. ट्रक, ट्रॅक्ट्रर, जेसीबी आदींसह हे अधिकारी येथे आले व त्यांनी न्यायलयाचा आदेश आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी थांबू नये असा इशारा दिला. आंदोलक महिलांना त्यानी येथून जावे असे सांगितले. त्यामुळे याभागात सकाळीच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Hupari Crime : या ठिकाणी दोनच दिवसांपूर्वी आंदोलकांनी कमान उभारली होती

या ठिकाणी दोनच दिवसांपूर्वी आंदोलकांनी कमान उभारली होती, ती अगोदर काढून टाकण्यात आली. यावेळी आंदोलकांनी तीव्र विरोध केला मात्र त्यांना ताब्यात घेऊन अतिक्रमनाची धडक मोहिम राबवण्यात आली.

ही जागा आमची असुन आम्हाला कब्जा मिळावा. या मागणीसाठी सदर जागेवर २८ डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरूच असून पोलीस बंदोबस्तातच ही कमान उभारली होती. यापूर्वी या आंदोलनादरम्यान मारामारी दगडफेक व काही महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्नही झाला होता. आज सकाळी आंदोलनंकर्त्याना वेळ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यायची कार्यवाही न झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

प्रशासनाने अतिक्रमण काढायला सुरुवात केली. येथे जवळपास ५० पत्र्याचे शेड होते. संसारोपोगी साहित्य आदी ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर असून आमच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार आंदोलक करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT