Anil Kapoor 
Latest

Anil Kapoor : हृतिक रोशनने अनिल कपूरचं केलं कौतुक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : दिग्गज अभिनेता अनिल कपूरने ( Anil Kapoor ) त्याच्या गौरवशाली कारकिर्दीतील अविश्वसनीय ४० वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्याचे भरभरून कौतुक केलं आहे.

अनिलने त्याच्या 'वो सात दिन' या पहिल्या हिंदी चित्रपटातील नॉस्टॅल्जिक क्लिप शेअर करत अष्टपैलू भारतीय चित्रपटसृष्टीत ४० उल्लेखनीय वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनिलने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी जिथे आहे तिथे हेच आहे, मला हेच करायचे आहे.'

Anil Kapoor ही पोस्ट काही तासातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर चाहत्यांसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनने त्यांच्या या पोस्टवर एक खास कॉमेंट केली आहे.

चित्रपटातील अनिल कपूरच्या नेत्रदीपक अभिनयाबद्दल हृतिकने कॉमेंटमध्ये लिहिलं की, '…आणि तुझे सर्वोत्तम काम सतत चांगले होत आहे. तू फायटरमध्ये सर्वोत्तम आहेस! खूप छान!.' आता ही कॉमेंट एक चर्चेचा विषय ठरली असून अनिल कपूरच्या आगामी 'फायटर' चित्रपटाबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अनिल कपूरचा प्रवास अगदीच विलक्षण ठरला आहे. चार दशकांच्या कारकिर्दीत ते भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे आयकॉन बनले आहेत. 'द नाईट मॅनेजर' 'पार्ट २', 'अॅनिमल' आणि 'फायटर' यासह त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT