Latest

Tips For Studies : मुले अभ्यासात टाळाटाळ करतात? अभ्यासात गोडी लागण्याच्या ‘या’ आहेत खास टिप्स

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: आजचे जग हे स्पर्धेचे, माहिती तंत्रज्ञानाचे आणि अफाट साधन-सुविधा उपलब्ध झाल्याने अधिक वेगवान झाले आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या या जगात मनुष्याचे भावविश्व देखील तितक्याच वेगाने बदलत आहे. वयोवृद्ध व्यक्ती, आई-वडील आणि तरूण यांच्याबरोबर मुलांचेही भावविश्व बदलत आहे. त्यामुळे मुलांच्या दैनंदिनीवरही याचा परिणाम होत आहे. समजा आई-वडील टीव्ही बघण्यात, मोबाईलवर व्यस्त असतील, तर मुलेही हीच कृती करतात. अप्रत्यक्षरित्या त्यांच्याही सवयी बदलू लागतात. अभ्यासाऐवजी ते देखील या स्क्रीनकडे वळले जातात. त्यामुळे मुलांना अभ्यासात (Tips For Studies) गोडी लावण्याच्या प्रक्रियेत आई-वडिलांसोबत, शिक्षकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. चला तर पाहुयात आपल्या मुलाला अभ्यासात गोडी लावण्‍यासाठीच्‍या काही खास  टिप्स…

Tips For Studies: आई-वडिलांनी मुलांशी संवाद साधावा

  • आत्तापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार अभ्यास म्हणजे फार त्रास, अवघड काम किंवा कंटाळवाणा प्रकार अशी काही पूर्वगृहदुषित मते लहान मुलांमध्ये असतात. त्यामुळे ते अभ्यासाला (Tips For Studies) टाळायला बघतात; पण आई-वडिलांना अभ्यासाविषयी मनमोकळेपणाने मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे.
  • आपण अभ्यासाची एक व्याख्या करून ठेवतो. अभ्यास (Tips For Studies)अमुक पद्धतीनेच, या वेळेतच, अशा शिस्तीतच करायचा, असा आग्रह करत आपण मुलांना अभ्यासासाठी जबरदस्ती करतो; मग या अभ्यासाची गोडी कशी लागणार? त्यामुळे मुलांच्या अभ्यासाला कोणतीही सीमा ठेवू नका. त्यांना मनमुरादपणे जेव्हा पाहिजे तेव्हा, कोणत्याही ठिकाणी मुक्तपणे अभ्यास करू द्या. त्याच्या या कृतीत त्याला मदत करा.
  • कोणत्याही प्रकारचा अभ्यास (Tips For Studies) करताना वाचन, लेखन, पाठांतर, टिपण काढणे, प्रश्न तयार करणे यातील कोणत्याही पद्धती वापरत असेल तर त्या बंधन घालू नका. तू आज वाचलच नाहीस, तू आज हे लिहलंच नाहीस असे कोणतेही प्रश्न विचारून विचारून त्या प्रेशराईज करू नका.
  • अभ्यास करताना महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणे किंवा वेगळ्या रंगाने रंगवणे, यांसारख्या कृती केल्याने अभ्यासाची गोडी वाढवता येते. नुसतेच आहे ते वाचन, लेखन करण्यापेक्षा कृतीतून मुलांच्या अधिक लक्षात रहाते. त्यामुळे अभ्यासातील घटकांवर काही ॲक्टिव्हिटी करून ते मुलांकडून करून घेता येतील. (उदा. मुलांना मराठी/ इंग्रजी बाराखडी पाठ करायची असल्यास त्याचे आणि शब्दांचे कार्ड करणे, त्याचा उलटा-सुलटा क्रम लावून घेणे, एका शब्दातून अनेक शब्द तयार करणे- (उदा अहमदनगर: नगर, मदन, मगर).
  • मुलांना अभ्यासापेक्षा संवाद आवडतो, त्यामुळे तुमचे अनुभव मुलांना शेअर करा. संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद द्या, त्यांना महत्त्व दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना तुमच्या या वयातील अनुभव शेअर करा. तुमच्याबाबतीतील काही मजेशीर किस्सेही शेअर करा.
  • गणिताची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना व्यवहारातल्या काही छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या. त्यांना दुकानातून काही सामान आणायला सांगा आणि यातून, काही तोडी गणिते सोडवूण घ्या. असे व्यवहारातले अनुभव दिल्याने, त्याला अभ्यास करताना आत्मविश्वास निर्माण होईल. 
  • विज्ञान, पर्यावरणाविषयी अभ्यासातील गोडी निर्माण करण्यासाठी, मुलांना छोट्या छोट्या उदाहरणातून विज्ञानातील संकल्पना समजून सांगा. (उदा. फॅन का फिरतो, तो गोलच का फिरतो, वीज कशी निर्माण होते, त्याचा आवाज का होतो) यामुळे हे अभ्यासक्रमात पुन्हा वाचताना त्यांना गोडी वाटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT