Houthi Fired On USA Ship 
Latest

Houthi Fired On USA Ship : ‘हुथी’ दहशतवाद्यांचा युद्धनौकेवर हल्ला; अमेरिकन लष्कराचा दावा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : यमेनमधील दहशतवादी संघटना हुथीने पुन्हा अमेरिकन युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. रविवारी (दि.२६) रात्री येमेनच्या भागातून अमेरिकेच्या 'यूएसएस मासन' (USS MASON) या युद्धनौकेवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात कोणतीही हानी झालेली नाही, असेही अमेरिका लष्कराने स्पष्ट केले आहे. (Houthi Fired On USA Ship)

 हुथी दहशतवाद्यांनी अमेरिकन युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर बंडखोरांनी डागलेली दोन्ही क्षेपणास्त्रे एडनच्या आखातातील जहाजापासून ११ मैल अंतरावर पडल्याचे दिसले, असेही अमेरिकन लष्कराने सांगितले आहे. (Houthi Fired On USA Ship)

यापूर्वी भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे अपहरण

यापूर्वी येमेनच्या हुथी बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे अपहरण केल्याची घटना समोर आली होती. अपहरण केलेल्या "गॅलेक्सी लीडर" या मालवाहू जहाजाचा कथित व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. हे जहाज इस्रायली असल्याचा हुथी बंडखोरांनी दावा केला होता. मात्र, इस्रायलने हा दावा फेटाळत, जहाजावर एकही इस्रायली नागरिक नसल्याचे म्हटले होते. हे जहाज तुर्कीहून भारताकडे येत असताना हुथी बंडखोरांनी गोळीबार करत या मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले होते.

इस्रायलने हिंसक कारवाया थांबवाव्यात, अथवा…

हुथी दहशतवादी संघटनेचा  प्रवक्ता मोहम्मद अब्दुल- सलाम यांनी X वर केलेल्‍या पोस्टमध्‍ये म्हटले होते की, जोपर्यंत इस्रायल गाझावरील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत आणखी सागरी हल्ले केले जातील. इस्रायलने आपल्या हिंसक कारवाया थांबवाव्यात. या कारवाया अशाच चालू राहिल्या तर तांबडा समुद्र तसेच तांबडा समुद्र आणि गल्फ ऑफ एडेन यांना जोडणाऱ्या बाब अल मॅनडेब या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इस्रायली जहाजांना आम्ही लक्ष्य करू, असा इशारा देखील याआधी हुथी बंडखोरांनी दिला होता.

इस्रायलकडून निषेध

इस्रायलने जहाज अपहरणाच्या घटनेचा निषेध करत, इराणवर जोरदार टीका केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आंतरराष्ट्रीय जहाजावर इराणने केलेल्या हल्ल्याचा इस्त्रायल तीव्र निषेध करतो. हे इराणी दहशतवादाचे आणखी एक कृत्य आहे. जागतिक शिपिंग मार्गांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वतंत्र जगाच्या नागरिकांविरुद्ध इराणच्या आक्रमकतेचे एक मोठे पाऊल आहे, असे देखील इस्रायलने म्हटले आहे. दरम्यान, इराणने इस्रायलचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT