चंद्रपूर : वृत्तसंस्था; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील एक घर सध्या चर्चेत आले आहे. १० खोल्यांचे हे घर अर्धे महाराष्ट्रात तर अर्धे तेलंगणात आहे. त्यामुळे तेथे राहणारे कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून सकाळची न्याहरी एका राज्यात, तर रात्रीचे जेवण दुसऱ्या राज्यात करते! (House Controversy )
वृत्तसंस्थेशी बोलताना जिवती तालुक्यातील महाराजगुडा गावातील या घराचे मालक उत्तम पवार म्हणाले, आम्हाला मात्र याचा काहीही त्रास नाही. आम्ही दोन्ही राज्यांना मालमत्ता कर देतो आणि दोन्ही राज्यांच्या योजनांचा लाभही घेतो! आमची वाहनेही दोन्ही राज्यांच्या पासिंगची आहेत. उत्तम आणि त्यांचे बंधू चंदू पवार यांचे १३ जणांचे संयुक्त कुटुंब येथे कित्येक वर्षांपासून राहते. या घराच्या चार खोल्यांसह किचन तेलंगणात, तर बेडरूमसह चार खोल्या महाराष्ट्राच्या सीमेत आहेत. या कुटुंबात मराठी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. १९६९ मध्ये सीमा वादावर तोडगा निघाला, तेव्हा पवार कुटुंबीयांची जमीन ऐन सीमेवर आली. जमिनीबरोबर त्यांचे घरही दोन राज्यांत विभागले गेले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून चिघळलेला असताना वाद सीमेवरील हे घर मात्र गुण्यागोविंदाने दोन्ही राज्यांची संस्कृती जपत नांदत आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर हे घर व्हायरल झाले आणि देशभरात त्यावर सकारात्मक उमटल्या.
हेही वाचा