पुढारी ऑनलाईन डेस्क : होंडा कंपनीची अमेझ (Honda Amaze) हे डिझेल व्हेरिअंट आता बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कॉम्पॅक्ट-सेडान सेगमेंटमधील शेवटची डिझेल इंजिनवर आधारित कार होती. एप्रिल २०२३ पासून ड्राईव्हिंग एमिशन ( आरडीई) हे नियम लागू करण्यात येणार आहेत. याआधीच भारतातील होंडा कंपनी डिझेल व्हर्जन बंद करत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
एका अहवालानुसार, डीलरद्वारे देण्यात आलेल्या माहितीमधून ही कार लवकरच बंद होणार हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर होंडाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून या डिझेल व्हेरिअंटबाबतची सर्व माहिती हटवली आहे. या निर्णयानंतर आता भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि हायब्रिड पॉवरट्रेनवर होंडा कंपनी लक्ष केंद्रित करण्याची योजना आखत आहे. मारुती सुझुकीच्या डिझायर, ह्युंदाईच्या ऑरा आणि टाटाच्या टिगोर यासारख्या कारची प्रतिस्पर्धी म्हणून अमेझ या कारची ओळख आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांच्या कालावधींमध्ये डिझेल व्हेरिअंट इंजिन असणाऱ्या इतरही काही कार बंद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आगामी आरडीई नियमांनुसार, छोट्या क्षमतेच्या डिझेल इंजिन कार बंद करणे अनिवार्य करणे आहे. नव्या नियमावलीनुसार अमेझ कारचे १.५ लीटर i-DTEC डिझेल इंजिन हे दिलेल्या उत्सर्जन नियमांनुसार चालत नाही. त्यामुळे या सेगमेंटच्या मागणीवर फरक जाणवू लागला आहे.
होंडा कंपनी भारतामध्ये फक्त डिझेल कारची विक्री करते. यामध्ये Honda WR-V आणि Honda City या मॉडेल आहेत. मात्र ही सर्व मॉडेल भारतीय बाजारपेठेत लवकरच बंद करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. होंडाची भारतातील १.५ लीटर इंजिनची पहिले कार मॉडेल हे अमेझ होते. ही कार 100 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच यामध्ये 5-Speed Manual Gearbox देखील दिलेले आहे.
Honda Amaze आता फक्त 1.2-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिनसह विक्रीसाठी उपलब्ध असेल. जे 90hp/110Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. तसेच या कार E, S आणि VX सारख्या ट्रिममध्ये उपलब्ध आहेत. कारची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपयांपासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी 9.48 लाख रुपये इतकी आहे.
हेही वाचा