Lisa Marie Presley 
Latest

Lisa Marie Presley : मायकल जॅक्सनची पहिली पत्नी लिसा मेरी प्रेस्लीचे निधन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड गायिका मायकल जॅक्सनची पहिली पत्नी लिसा मेरी प्रेस्ली ( Lisa Marie Presley ) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. लिसाची आई प्रिसिला प्रेस्ले यांनी गुरुवारी त्याच्या मुलीच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

लिसाची आई प्रिसिला प्रेस्ली यांनी पोस्ट शेअर करत सांगितले की, "मला खूपच दु:ख होत आहे कारण माझी सुंदर मुलगी लिसा मेरी आम्हाला सोडून गेली आहे. ती खूप भावनिक, कणखर आणि प्रेमळ स्त्री होती. लिसा मेरी प्रेस्ली यांना लॉस एंजेलिसच्या उपनगरातील कॅलाबासास येथील तिच्या घरी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

लिसा ग्रेसलँड हवेलीची मालकीन

लिसा मेरी प्रेस्लीचा ( Lisa Marie Presley ) जन्म १९६८ साली झाला. मेम्फिसमध्ये तिच्या वडिलांच्या ग्रेसलँड हवेलीची ती मालकीन होती. २००३ मध्ये पहिल्या 'टू व्हॉट इट मे कन्सर्न' अल्बमपासून लिसाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर २००५ रोजी 'नाऊ व्हॉट' सह बिलबोर्ड २०० अल्बम चार्टमध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळवले. २०१२ मध्ये 'स्टॉर्म अँड ग्रेस' हा तिसरा अल्बम रिलीज झाला.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT