Latest

Hollywood Actor Christian Oliver dies | हॉलिवूडला धक्का! अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्समधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व कॅरिबियनमधील एका छोट्या खासगी बेटाजवळ झालेल्या विमान अपघातात अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. त्यांचे छोटे विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कॅरेबियन समुद्रात कोसळले, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. (Hollywood Actor Christian Oliver dies)

बेकियाजवळील पेटिट नेव्हिस बेटाच्या अगदी पश्चिमेस विमान जवळच्या सेंट लुसियाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. मदिता क्लेपसर (वय १०) आणि ॲनिक क्लेपसर (१२) अशी अपघातात मृत्यू झालेल्या ख्रिश्चन ऑलिव्हर यांच्या मुलींची नावे आहेत. तसेच पायलट रॉबर्ट सॅक्स यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (#PlaneCrash)

या अपघातानंतर मच्छीमार, चालक आणि तटरक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चार मृतदेह बाहेर काढले. हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून सेंट लुसियाला जात होते. या दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

जर्मनीमध्ये जन्मलेल्या ५१ वर्षीय अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हरने ६० चित्रपट आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांत भूमिका केल्या. त्यात २००८ मधील "स्पीड रेसर" आणि "द गुड जर्मन" चित्रपटांचा समावेश आहे. त्याने १९९० च्या सीरीजमधील "सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास"च्या सीझन दोनमध्ये ब्रायन केलर नावाच्या स्विस ट्रान्सफर विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती.

ऑलिव्हरने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एका समुद्रकिनाऱ्याचा फोटो पोस्ट केला होता. यामुळे तो सहकुटुंब सुट्टीवर असल्याचे दिसले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT