पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकामध्ये एका ल्युकेमेनिया पीडित महिलेने 'एचआयव्ही'वर मात केली आहे. ( HIV negative ) 'एचआयव्ही'ची लागण
झाल्यानंतर पूर्ण बरी होणारी ती पहिली महिला ठरली आहे. तर आतापर्यंत 'एचआयव्ही'मुक्त झालेली तिसरी व्यक्ती ठरली आहे.
'एचआयव्ही'ची लागण झाल्यानंतर मृत्यूचवी टांगती तलवार ही रुग्णांचा आत्मविश्वास पूर्णपणे उद्ध्वस्त करते. आज जगभरात सुमारे ३.५३ कोटी नागरिक 'एचआयव्ही' पीडित आहेत. या राेगात रुग्णाची प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होते. मागील अनेक वर्ष शास्त्रज्ञ 'एचआयव्ही'व संशोधन करत होते. आता या कष्टाला फळ येताना दिसत आहे.
अमेरिकेतील डॉक्टरांनी एका 'एचआयव्ही' बाधित महिलेला पूर्ण बरे केले आहे. या महिलेवर , 'स्टेम सेल ट्रान्स्प्लांट'च्या माध्यमातून उपचार करण्यात आले. यासंदर्भात डॉक्टर स्टीवन डिक्स यांनी सांगितले की, उपचार करण्यात आलेल्या महिलेचे आईवडील श्वेत आणि अश्वेत वर्णाचे होते. दोन वंश आणि रुग्ण महिला असने या गोष्टही शास्त्रीयदृष्ट्या महत्वपूर्ण ठरल्या.
संबंधित महिलेस २०१३ मध्ये ल्युकेमेनिया झाला होता. यानंतर तिला एचआयव्हीचीही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ल्युकेमेनियावर उपचार करताना डॉक्टरांनी स्टेम सेल ट्रान्स्प्लांट'ने यशस्वी उपचार केले. अम्बिलिकल कॉर्डमधून टेम्स सेल्स मिळवण्यात आले. ज्या व्यकीचे स्टेम सेल दिले होते. यामध्ये एचआयव्हीविरोधात लढण्याचे नैसर्गिक प्रतिकार क्षमता होती. त्यामुळे आता संबंधित महिला एचआयव्हीमुक्त झाली आहे. एचआयव्हीसाठी हे संशोधन भविष्यात मोलाची कामगिरी करेल, असा विश्वास आंतरराष्ट्री एड्स सोसायटीचे अधक्ष शॅरन लेविन यांनी व्यक्त केला आहे.
कॉर्ड ब्लड स्टेम सेलचा उपचार बोन मैरो ट्रान्सप्लांटमध्ये केला जातो. 'स्टेम सेल ट्रान्स्प्लांट'ने आतापर्यंत जगात दोन एचआयव्ही रुग्णांनी एचआयव्हीवर मात केली आहे. यातील टिमोथी रे ब्राऊन हे १२ वर्षांहून अधिक काळ 'एचआयव्ही'मुक्त होते. मात्र २०२०मध्ये त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. २०१९मध्ये ॲडम कॅस्टिलेजो यांनीही 'स्टेम सेल ट्रान्स्प्लांट'ने एचआयव्हीवर मात केली होती. या दोघांना डोनरने दिलेल्या स्टेम सेलमध्ये एचआयव्ही विषाणुला प्रतिबंध करतील, असे म्युटेशन मिळाले होते. असे म्युटेशन मिळणे दुर्मिळ असून २० हजार डोनरमागे एकामध्ये तसे मिळु शकते, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?