हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर जवळाबाजार शिवारामध्ये विटांनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना (रविवार) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिस व गावकऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
परळी येथून एका ट्रममध्ये विटा भरून ट्रक वाशीमकडे नेला जात होता. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ट्रक जवळाबाजार शिवारात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात ट्रकखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. यामुळे ट्रकमधील विटा औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर विखुरल्या गेल्या. मुख्य रस्त्यावरच विटा पडल्यामुळे परभणी व हिंगोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
या अपघाताची माहिती मिळताच ह्ट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीष तावडे, जमादार राजेश ठाकूर, भुजंग कोकरे, सरपंच दत्ता अंभोरे, माऊली ढोबळे, सचिन जैन, बाळू जैन, विठ्ठल नागरे, गोविंद मुळे, गजानन काळे, भुषण पाचकवडे, हनुमान नागरे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जेसीबी मशीन बोलावली. मात्र तो पर्यंत वाहतूक ठप्प झाल्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील विटा बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
तब्बल अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या अपघातात दोन जणांचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. त्यांचे नांव समजू शकले नाही. सदर ट्रक वाशिमकडे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :