हिमांशू मल्होत्रा-अमृता खानविलकर 
Latest

Himanshu Malhotra : अमृताचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या लव्हस्टोरी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमांशू मल्होत्रा हा मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा पती आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असावी. पण तुम्हाला माहितीये का, हिमांशू मल्होत्रा हा एक मॉडेल आणि अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमृता खानविलकर हिचा आज २३ रोजी वाढदिवस आहे. हिमांशूने तिला इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक बर्थडे व्हिडिओ शेअर केला आहे. (Himanshu Malhotra ) जाणून घेऊया, हिमांशू मल्होत्राविषयी. (Himanshu Malhotra )

हिमांशूने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिली आहे- "Happy Birthday ? ? ?❤️ @amrutakhanvilkar Blessings, wishes, prayers and Love for you ? May this year be Beautiful and Special for you ? Amen??"

२ एप्रिल, १९८२ रोजी नवी दिल्ली येथे हिमांशूचा जन्म झाला. कुलाची हंसराज मॉडल स्कूल, नवी दिल्ली येथे शालेय शिक्षण घेतेले होते. पुढे येथूनच हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठ येथून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याने सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग केले होते.

मिस्टर खुजली या चित्रपटातून त्याने चित्रपट विश्वात पदार्पण केले होते. बाबुल का आंगन छूटे ना या मालिकेतून त्याने टीव्ही डेब्यू केला होता. नच बलिए या शोच्या माध्यमातून अमृता आणि हिमांशू स्पर्धक म्हणून एकत्र आले होते. २०१५ मध्ये दोघे नच बलिए – ७ चे विजेते ठरले होते. हिमांशूने २००४ मध्ये 'इंडियाज सिनेस्टार की खोज'मध्ये सहभाग घेतला होता. एमटीव्ही 'स्प्लिट्सविला' स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता मोहित मल्होत्राचा तो भाऊ आहे. २०१५ मध्ये त्याने 'खतरों के खिलाडी' च्या सातव्या सीझनमध्ये भाग घेतला होता.

अशीही लव्हस्टोरी

असं म्हटलं जातं की, अमृता-हिमांशू यांनी एकमेकांना १० वर्षे डेट केलं. अमृता आणि हिमांशूची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला ओळख, मैत्री आणि नंतर एकमेकांचे ते जीवनसाथी बनले. मीडिया रिपोर्टनुसार, हिमांशू आमि अमृता यांच्या रिलेशनशीपमध्ये खूप रुसवे -फुगवे व्हायचे. पण एक दिवस दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं आणि दोघांचं नातं तुटलं. अमृता हिमांशूला विसरु शकत नव्हती. ती पुन्हा हिमांशूकडे आळी, दोघांची मैत्री पुन्हा जुळली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २४ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी लग्न केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT