पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचलमधील स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये 22-24 ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. आज ( २1 ऑगस्ट) मुसळधार पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. रविवारी (दि.२०) राज्याच्या काही भागात हलका पाऊस झाला. (Himachal Rain Alert)
गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. अजूनही हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या हिमाचलमधील परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी रविवारी (दि.२०) दिली आहे.
हिमाचलमधील स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये 22-24 ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. आज ( २1 ऑगस्ट) मुसळधार पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.अतिवृष्टीमुळे भूस्खलन, अचानक पूर येण्याची आणि नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे हिमाचलमध्ये पिकांचेही नुकसान होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने चंबा आणि मंडी जिल्ह्यांच्या पाणलोट भागात अचानक पूर येण्याच्या मध्यम धोक्याचा इशारा दिला आहे
हेही वाचा