पुढारी ऑनलाइन डेस्क : Himachal Disaster : हिमाचलमध्ये काही भागात पुन्हा एकदा ढगफूटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर मुसळधार पावसाने नदीच्या पाण्याची पातळी वाढून एक पूल कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली आहेत. अनेक भागात मलबा आणि पाणी साचले आहे. भूस्खलनामुळे विविध राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाले आहेत. परिणामी लोकांच्या मनात घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडून हिमाचल आणि उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. इंडिया टुडेने याविषयी वृत्त दिलेले आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशातील सुबाथू येथे बुधवारी ढगफुटी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ढगफुटीमुळे पडलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे प्रदेशात मलबा आणि पाणी साचले आहे. वाहने देखील पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. (Himachal Disaster)
राष्ट्रीय महामार्ग 21 मंडी-कुल्लू मार्गे पांडोह धरण रस्ता मुसळधार पावसात विविध ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे ब्लॉक झाला होता. राज्यातील इतरही अनेक रस्ते रोखण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे बालद नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बड्डीमध्ये पूल कोसळला. पूल कोसळल्याने बड्डी येथील औद्योगिक क्षेत्राचा हरियाणा आणि चंदीगडशी संपर्क प्रभावित झाला. पिंजोर ते बलद, चंदीगड रोडजवळील राष्ट्रीय महामार्ग 105 वर पोलिसांनी वाहतुकीचे नियमन केले. लक्कर दीपू पुलावरून वाहतूक बरोतीवालाकडे वळवली जात आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा पाहता शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बुधवार आणि गुरुवारी बंद राहतील. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर, हमीरपूर, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर आणि उना जिल्ह्यांसह काही भागांसाठी संध्याकाळी रेड अलर्ट जारी करण्यात आला. कारण मंगळवारी झालेल्या पावसामुळे मंडी आणि हमीरपूर जिल्ह्यात काही भूस्खलन झाले आणि इतर भागात झाडे उन्मळून पडली. IMD ने 28 ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस सुरूच होता, ज्यामुळे हवामान खात्याने राज्यात रेड अलर्ट जारी केला. भारतीय हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये गारांसह अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Himachal Disaster
हे ही वाचा :