Wireless smartphone charger 
Latest

स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग: मोबाईलच्या बॅटरी लाईफवर परिणाम होतो का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

स्मार्टफोन तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदलत होत आहेत. आधी मोबाईल चार्ज होण्यासाठी दोन तास लागायचे. त्यानंतर फास्ट चार्जर बाजारात आले जे मोबाईल फोन काही मिनिटांत चार्ज करतात. पण आता या पुढचा काळ वायरलेस चार्जिंगचा असणार आहे. सुरुवातीला वायरलेस चार्जिंगची सुविधा महागड्या आणि प्रीमियम स्मार्टफोनमध्येच उपलब्ध होती, पण आज हे तंत्रज्ञान कमी किंमतीच्या स्मार्टफोनमध्येही पाहायला मिळत आहे. वायरलेस चार्जिंगचा वापर करताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे की, वायरलेस चार्जिंग वापरल्याने मोबाईलच्या बॅटरी लाइफवर परिणाम तर होणार नाही का? वायरलेस चार्जिंग कितपत सुरक्षित आहे? आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

वायरलेस चार्जिंग म्हणजे काय?

वायर असलेल्या चार्जरपेक्षा वायरलेस चार्जिंग अधिक सोयीस्कर आहे. कारण यामध्ये तुम्हाला चार्जरला वायरशी जोडण्याची गरज भासत नाही. तुम्हाला फक्त तुमचा चार्जर पॉवर सॉकेटमध्ये प्लग करायचा आहे. त्यानंतर मोबाईल चार्जर पॅडवर ठेवला की मोबाईल चार्ज होण्यास सुरुवात होते.

वायरलेस चार्जिंग कसे कार्य करते?

वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर कार्य करते. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र विज हस्तांतरीत करण्यासाठी वापरले जाते. वायरलेस चार्जिंग पॅडमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉल इन बिल्ट आहे. याच प्रकारचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉल मोबाईल फोनच्या मागील बाजूलाही बसवलेला असतो. जेव्हा तुम्ही फोन चार्जिंग पॅडवर ठेवता तेव्हा चार्जिंग पॅड आणि मोबाईलच्या मागील बाजूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉल दरम्यान चुंबकीय क्षेत्र तयार होते. ज्याद्वारे चार्जरमधून मोबाईलमध्ये वीज हस्तांतरित केली जाते.

बॅटरी लाइफवर परिणाम?

कोणत्याही स्मार्टफोनची बॅटरी क्षमता कालांतराने कमी होत जाते. तुम्ही दीर्घकाळ वायरलेस चार्जिंग वापरत असल्‍यासही बॅटरीचे लाइफ हळू हळू कमी होत जाते. त्यामुळे वायर असलेल्या चार्जरपेक्षा वायरलेस चार्जर चांगले मानले जातात. कारण जर तुम्ही 30W वायरलेस चार्जर वापरत असाल परंतु तुमचा फोन फक्त 15W चार्जिंगला सपोर्ट करत असेल. त्यामुळे वायरलेस चार्जर तुमचा फोन फक्त 15 वॅट्सनुसारच चार्ज करेल.

वायरलेस चार्जिंग सुरक्षित आहे का?

वायरलेस चार्जिंग हे वायर चार्जरपेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. कारण यामध्ये शॉर्ट सर्किटचा धोका नाही. तसेच चार्जिंगसाठी खूप कमी पॉवर वापरली जाते. त्यामुळे विजेचा धक्का लागण्याचीही शक्यता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT